जेरूसलेम : इस्रायलने व्यापक प्रमाणावर कोरोना लसीकरण मोहीम राबवणे सुरू केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची अट मागे घेतली आणि शिक्षण संस्था पूर्णपणे खुल्या केल्या. सगळ्या प्राथमिक आणि माध्यमिक वर्गांचे विद्यार्थी रविवारी शाळेत येऊ लागले आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची गेल्या वर्षभरापासून लागू असलेली अट आरोग्य अधिकाऱ्यांनी मागे घेतली.
इस्रायलने खूप वेगाने लोकसंख्येतील बहुसंख्यांना मोहिमेत लस दिली. त्याने कोरोनाबाबतील बरेचसे निर्बंध मागे घेतले असून लस घेतलेल्या विदेशी पर्यटकांना मे महिन्यापासून इस्रायलमध्ये पुन्हा प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा गेल्या आठवड्यात करण्यात आली होती.
देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण८ लाख ३६ हजार रुग्ण गेल्या वर्षी कोरोना महामारी सुरू झाल्यापासून नोंदले गेले तर किमान ६३३१ जणांचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
जोखीम घेतलीही अपयशाची शक्यता गृहीत धरून घेतलेली जोखीम असल्याचे कोरोना विषाणूतज्ज्ञ नॅकमॅन ॲश यांनी म्हटले.
9.3 दशलक्ष नागरिकांपैकी ५३ टक्क्यांपेक्षा जास्त जणांची फायझर, बायोएनटेक लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन झाली. इस्रायलने गेल्या डिसेंबरमध्ये लसीकरण सुरू केल्यापासून कोरोनाचे गंभीर रुग्ण आणि मृत्यूंमध्ये लक्षणीय घट झाली आहे.