शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

इस्रायलचा अभेद्य बुलडोझर युद्धभूमीवर; रॉकेट हल्ल्याची 'दांडी गूल'! नाव काय, किंमत किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 7:07 PM

Israel deploys world most indestructible bulldozer against Hamas: AK-47 तर सोडाच, रॉकेट, RPG, भूसुरूंग अन् स्नायपर हल्ल्यांचाही होत नाही परिणाम 

Israel deploys world most indestructible bulldozer against Hamas: इस्रायलने हमासच्या हल्ल्यानंतर गाझामध्ये आपल्या हल्ल्याचे नेतृत्व करण्यासाठी आता नवा 26 फूटी लांब अभेद्य बुलडोझर उतरवला आहे. हा बुलडोझर गाझा सीमेवर उभ्या असलेल्या 360,000 इस्रायली सैनिकांना मार्ग दाखवण्याचं काम करणार आहे. हमासच्या हल्ल्यात 1300 हून अधिक नागरिक मारले गेल्यानंतर, इस्रायली संरक्षण दलांनी बदला घेण्यासाठी आपली संपूर्ण लष्करी शक्ती वापरली आहे. इस्रायलने गाझा पट्टीलाही पूर्णपणे वेढा घातला आहे. अशा परिस्थितीत या दाट लोकवस्तीच्या भागात मार्ग काढण्यासाठी इस्रायलला आपल्या सुपर पॉवरफुल बुलडोझरची मोठी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. दाट लोकवस्तीच्या गाझा पट्टीतही हा बुलडोझर सहज मार्ग काढू शकतो असे सांगितले जात आहे.

इस्रायली सैन्याच्या या बुलडोझरचे नाव काय?

इस्रायली लष्कराच्या शस्त्रागारात समाविष्ट असलेल्या या बुलडोझरचे नाव D9R आहे. D9R आर्म्ड (शस्त्रास्त्रांनी युक्त) बुलडोझरमध्ये 15 टन अतिरिक्त चिलखत बसवले आहे. त्याला डूबी किंवा टेडी बेअर असेही म्हणतात. हा तोच बख्तरबंद बुलडोझर आहे, ज्याला पाहून हमासचे दहशतवादीही घाबरतात. हा बुलडोझर इतका शक्तिशाली आहे की AK-47 तर सोडा, अगदी रॉकेट आणि RPG हल्ल्यांचाही त्यावर काहीही परिणाम होत नाही. लँडमाइन्स आणि स्नायपर हल्ल्यांचाही या बुलडोझरवर काहीही परिणाम होत नाही. गाझा पट्टीच्या दाट लोकवस्तीच्या भागात असलेल्या रस्त्यांच्या चक्रव्यूहावर मात करून ते बहुमजली इमारती सहज फोडू शकते आणि सरळ आणि सपाट रस्ते तयार करू शकते.

या इस्रायली बुलडोझरची किंमत किती आहे?

रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड्सपासून अधिक संरक्षण प्रदान करण्यासाठी 2015 मध्ये D9R ला "स्लॅट आर्मर"ने अपग्रेड केले गेले. हा बुलडोझर आपल्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यास सक्षम आहे. ते खंदक खोदून पूल बांधू शकते. इस्रायली सैन्यात समाविष्ट असलेल्या या बुलडोझरची किंमत 7 लाख 39 हजार पौंड आहे. नंतर इस्रायली तज्ज्ञांनी याला अनेक प्रकारच्या विशेष शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले. त्यामुळे बुलडोझरचे वजन वाढत असले तरी त्याला सर्व प्रकारच्या शस्त्रांपासून संरक्षण मिळते.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलwarयुद्ध