शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
3
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
4
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
5
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
7
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
8
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
9
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
10
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
11
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
12
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
13
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
14
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
15
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
16
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
17
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
18
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
19
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
20
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...

इस्रायलचा मोठा निर्णय! संयुक्त राष्ट संघटनेच्या निर्वासितांबद्दलच्या UNRWA संस्थेची संबंध तोडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 16:26 IST

Israel ends agreement with UN refugee agency: इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यातील काही लोकांची जाणूनबुजून चौकशी न केल्याचा आरोप इस्रायलने UNRWA वर लावला

Israel ends agreement with UN refugee agency: इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. दरम्यान, इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या पॅलेस्टिनी निर्वासित संस्थेशी (UNRWA) संबंध तोडले आहेत. इस्रायलने युनायटेड नेशन्सला अधिकृतपणे कळवले आहे की ते युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रिफ्युजीज (UNRWA) सोबतचे संबंध तोडत आहेत. गाझासह मध्य पूर्वेतील पॅलेस्टिनींना मदत करणारी ही मुख्य नेशन्सची एजन्सी आहे. त्यांच्याशी असलेले राजकीय संबंध इस्रायलने तोडले असल्याची माहिती सरकारने दिली.

७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात UN च्या त्या एजन्सीचे काही कर्मचारी सहभागी होते असा आरोप इस्रायलने लावला आणि UN ने स्वत:च्या कर्मचाऱ्यांची चौकशी न केल्याचाही आरोप इस्रायलने केला. इस्रायलचे राजदूत डॅनी डॅनन यांनी त्यांच्या सोशल मीडिया साइटवर एक पोस्ट शेअर केली. त्यात ते म्हणाले, 'UNRWA मध्ये हमासची घुसखोरी सिद्ध करणारे पुरावे आम्ही UN ला सादर केले असूनही, यूएनने हे वास्तव लक्षात घेतले नाही'.

इस्रायलने UNRWA सोबतचे संबंध तोडले

इस्रायलचे राजदूत डॅनन यांनी आपल्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, इस्रायल राज्य मानवतावादी संघटनांना सहकार्य करत राहील. पण अशा संघटनांशी संबंध ठेवणार नाही जे आमच्याविरुद्ध दहशतवादाला प्रोत्साहन देतात. युनायटेड नेशन्समध्ये राजदूत डॅनी डॅनन यांनी घोषणा केली की त्यांनी पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी (UNRWA) सोबतचे संबंध संपुष्टात आणले.

UNRWA वर बंदी घालण्यासाठी मतदान करा

UNRWA ने प्रतिक्रिया दिली की इस्रायलच्या निर्णयामुळे गाझामधील मानवतावादी मदतीचे प्रयत्न कोलमडू शकतात. गेल्या महिन्यात २८ ऑक्टोबर रोजी इस्रायली संसदेने गाझामधील मानवी हक्कांच्या परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय टीका करत UNRWA वर निर्बंध लादण्यासाठी मतदान केले. इस्रायली संसदेने UNRWA ला इस्रायलमध्ये काम करण्यावर बंदी घालणारी आणि गाझा पट्टीतील पॅलेस्टिनींना मदत करणाऱ्या मुख्य एजन्सी, UN एजन्सीशी संपर्क साधण्यापासून इस्रायली अधिकाऱ्यांना प्रतिबंध करणारी दोन विधेयके मंजूर केली.

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ