शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 11:13 AM

Israel Hezbollah War: इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कस जवळील भागांना हवाई हल्ले करून लक्ष्य केले.

Israel Airstrike in Syria, Hezbollah Intel Target: इस्रायलनेसीरियाची राजधानी दमास्कस जवळील भागांना हवाई हल्ले करून लक्ष्य केले. इस्रायली शत्रूने संध्याकाळी दमास्कसच्या दक्षिणेकडील अनेक नागरी स्थळांना लक्ष्य करून सीरियन गोलानच्या दिशेने हवाई हल्ले केले, ज्यामुळे खूप नुकसान झाले आहे, असे सीरियन संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. हानी किती प्रमाणात झाली याबाबतचे तपशील मात्र त्वरित उपलब्ध झालेले नाहीत.

दरम्यान, इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी हिजबुल्लाची गुप्तचर क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशाने सीरियातील हिजबुल्लाहचे गुप्तचर मुख्यालय म्हणून वापरल्या जाणाऱ्या तळावर हल्ला केला. लष्कराने सांगितले की हल्ला केलेला तळ हा हिजबुल्लाच्या गुप्तचर मुख्यालयाची एक शाखा म्हणून कार्यरत असल्याचे बोलले जात होते. येथे एक स्वतंत्र गुप्तचर तळ प्रस्थापित केला गेला होता. हिजबुल्लाच्या गुप्तचर प्रमुखाच्या आदेशाने येथील नेटवर्क वापरले जात होते.

ब्रिटनच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांमध्ये दमास्कस ग्रामीण भागाच्या दक्षिण आणि आग्नेय भागात सय्यदाह झैनब येथील शेतांवर तीन स्वतंत्र हल्ल्यांचा समावेश आहे. हा हल्ला सीरियामधील हिजबुल्ला गुप्तचर मालमत्तेवर आणि लेबनानमधील हिजबुल्लाच्या तळावर केलेला हल्ला आहे.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलSyriaसीरिया