गाझा - इस्रायल आणि पॅलेस्टाइनची दहशतवादी संघटना हमास यांच्यात सीझफायर लागू करण्यात आले आहे. या घोषणेनंतर गाझा पट्टीमध्ये शांताता आहे आणि लोक जल्लोष करत आहेत. 11 दिवस चाललेल्या या भयंकर संघर्षात 232 पॅलेस्टिनी लोकांचा बळी गेला आहे. तर इस्रायलचेही 11 लोक मारले गेले आहेत. आजार संपेपर्यंत हल्ले सुरूच राहतील, अशी घोषणा करणाऱ्या इस्रायलकडून सीझफायरची घोषणा करण्यात आली आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील गेल्या आनेक दशकांचा विचार करता, हा सर्वात भीषण संघर्ष होता, असे म्हटले जात आहे. या काळात हमासकडून 4 हजारहून अधिक रॉकेट डागण्यात आले. तर इस्रायलनेही गाझामध्ये क्षेपणास्त्रांचा मारा करून आणि बॉम्ब वर्षाव करून शहराचा मोठा भाग उद्ध्वस्त केला. या भीषण संघर्षानंतर सीझफायरची घोषणा झाल्यानंतर लोकांच्या आनंदाला पारावार नव्हता. लोक रस्त्यावर उतरून जल्लोष करत होते.
गाझाच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे, की 10 मेपासून सुरू असलेल्या संघर्षात 232 पॅलेस्टिनी नागरीक मारले गेले आहेत. यात 65 मुलांचा समावेश आहे. तर 39 महिला ठार झाल्या आहेत. इस्रायली हल्ल्यात 1900 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक जखमी झाले आहेत. तर तिकडे, इस्रायलने दावा केला आहे, की त्यांनी हमास आणि इस्लामिक जिहाद सारख्या गटांचे किमान 160 जणांना मारले आहे. इस्रायलमध्येही 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर रॉकेट हल्ल्यांत शेकडो लोक जखमी झाले आहेत.
Israel Palestain Conflict : पॅलेस्टाइनवर हल्ले सुरू असतानाच इस्रायल चीनवर भडकला! म्हणाला...
आम्हीच जिंकलो, दोन्ही पक्षाचा दावा -युद्धबंदीनंतर, दोन्ही पक्षांनी आपापल्या विजयाचा दावा केला आहे. युद्धबंदीच्या घोषणेनंतर मशिदींमधून लाउड स्पीकरवरही याची घोषणा करण्यात आली. यात दावा करण्यात आला आहे, की इस्रायलसोबत 'स्वार्ड ऑफ जेरुसलेम'च्या युद्धात विजय मिळाला आहे. एवढेच नाही, तर शांततेच्या संबंधांचे उल्लंघण झाल्यास ते पलटवार करण्यासाठी तयार आहेत, असे दोन्ही पक्षांनी म्हटले आहे.
'आजारापासून मुक्ती हवी, केवळ मलम पट्टी नको' -सांगण्यात येते, की अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन यांच्या मोठ्या दबावानंतर इस्रायल सीझफायरसाठी तयार झाला आहे. तसेच इजिप्तच्या मध्यस्तीनंतर ही घोषणा करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. बायडेन यांनीही इजिप्तच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते. तत्पूर्वी, आम्हाला आजारापासून मुक्तता हवी आहे, केवळ मलम-पट्टी नको, असे अस्रायलने म्हटले होते.