Israel-Hamas:इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास, यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान चीनमध्येइस्रायली अधिकाऱ्यावर(डिप्लोमॅट) प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. इस्रायली अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेला दुजोरा दिला. सध्या त्या अधिकाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, बीजिंगमधील इस्रायली दूतावासातील एका अधिकाऱ्यावर शुक्रवारी हल्ला करण्यात आला. मात्र, हल्ल्याचे कारण समोर आलेले नाही. चीनमध्ये इस्रायली अधिकाऱ्यावर हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा इस्रायल आणि हमासमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे.
पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने 7 ऑक्टोबर रोजी गाझा पट्टीतून इस्रायलवर हजारो रॉकेट डागले. एवढंच नाही तर हमासच्या सैनिकांनी इस्रायलच्या हद्दीत घुसून नरसंहार घडवला. या हल्ल्यांमध्ये 1200+ लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल गाझा पट्टीतील हमासच्या स्थानांवर बॉम्बफेक करत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 1500+ लोक मारले गेले आहेत.
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगातील सर्व देश दोन गटात विभागले गेले आहेत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसह अनेक युरोपीय देशांनी हमासला दहशतवादी संघटना ठरवून इस्रायलच्या कारवाईचे समर्थन केले आहे. तर, इराण, सौदीसह सर्व अरब देश इस्रायलच्या कारवाईला चुकीचे म्हणत आहेत.