हमास आणि इस्रायलमधील अनेक महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले आहे. दरम्यान, इस्त्रायलने दक्षिण गाझामधील रफाह शहरावर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात १३ जण ठार झाले आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, हमासच्या प्रसारमाध्यमांनी मृतांची संख्या १५ असल्याचे सांगितले आहे. पट्टीच्या उत्तरेकडील गाझा शहरात, इस्रायली विमानाने दोन घरांवर हल्ला केला, ज्यात अनेक लोक ठार आणि जखमी झाले, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
इस्त्रायलच्या बॉम्ब हल्ल्यापासून वाचण्यासाठी लोक रफाह शहरामध्ये आश्रय घेत आहेत. परंतु आता इस्त्रायलने रफाह शहरावरच हवाई हल्ले केले आहेत. इस्त्रायल आणि हमासच्या नेत्यांमध्ये युद्धासंबंधित संभाव्या चर्चा होण्याची शक्यता होती. त्याचवेळी हा हल्ला करण्यात आला आहे.
इस्त्रायल आणि हमासच्या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. इस्त्रायलने हमासला हरवण्यासाठी लष्करी कारवाई केली होती. यात जवळपास ३४,००० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धामुळे २३ लाख लोकांना विस्थापित केले आहे.
इस्त्रायल आणि हमासमध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून युद्ध सुरु आहे. हमासने इस्त्रायलवर पाच हजारांहून अधिक रॉकेट टाकले होते. त्यानंतर इस्त्रायलने युद्धाची घोषणा केली होती.
इस्त्रायल आणि हमासच्या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायने हमासवर प्रत्युत्तर देण्यासाठी हल्ला केला. त्यात गाझामध्ये तब्बल ३४ हजार पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. यात ७० टक्के महिला आणि लहांन मुलांचा समावेश आहे.