Israel-Hamas War: इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास, यांच्यात युद्ध सुरू आहे. हे युद्ध केवळ शस्त्रांच्या बळावर लढले जात नाहीये, तर जगभरातील हमास आणि इस्रायलचे समर्थकही आपापसात लढत आहेत. ही लढाई सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सुरू आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला दोन्ही बाजूचे व्हिडिओ, फोटो, मतं, बातम्या पाहायला मिळतील.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर तुम्हाला टॉप ट्रेंडमध्ये, फक्त हमास आणि इस्रायल दिसतील. अनेक हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आहेत, ज्यामध्ये लोक या युद्धाशी संबंधित माहिती शेअर करत आहेत. आता या युद्धाच्या पार्श्वभूमीवर X च्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी गुरुवारी एक मोठी घोषणा केली आहे.
X च्या सीईओ काय म्हणाल्या?X ने हमासशी संबंधित शेकडो-हजारो खाती हटवली आहेत. कंपनी एकतर हमासशी संबंधित खाती काढून टाकत आहे किंवा लेबल करत आहे. इस्रायलवर हल्ला सुरू झाल्यापासून X ने लाखो कंटेटला लेबल लावले आहे. लिंडा यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून एक पत्र देखील पोस्ट केले आहे. हे पत्र बुधवारी EU कमिशनर बेटन यांना पाठवण्यात आले. त्या म्हणाल्या, 'आम्ही युरोपियन युनियन राज्यांसह जगभरातील इतर कायद्यांची अंमलबजावणी करण्याच्या विनंतीला वेगाने प्रतिसाद देत आहोत.'