इस्रारायल-हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे किमान 4500 हून अधिक लोक मारले गेले आहेत. यातच, इस्रायलने गाझातील एका रुग्णालयावर हल्ला केल्याचा दावा हमासने मंगळवारी रात्री उशिरा केला. या हल्ल्यात 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या या दाव्यानंतर, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनीही उत्तर दिले आहे.
इस्रारायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, संपूर्ण जगाला हे माहीत असायला हवे, की गाझामध्ये जो हल्ला झाला आहे, तो दहशतवाद्यांनी केला आहे, इस्रायली सैनिकांनी नाही. ज्या लोकांनी आमच्या मुलांच्या निर्घृन हत्या केल्या, ते त्यांच्या मुलांच्याही हत्या करत आहेत.
रुग्णांलयावरील हल्ल्यासंदर्भात IDF - तत्पूर्वी, यासंदर्भात माहिती देताना आयडीएफने म्हटले आहे, रुग्णालयावरील हल्ल्याला इस्लामिक जिहाद जबाबदार आहे. शत्रूकडून इस्रायलवर अनेक रॉकेट लॉन्च करण्यात आले होते. यांपैकी एका अयशस्वी छरलेल्या रॉकेटने गाझातील या रुग्णालयाला निशाणा बनवले. आमच्याकडे असलेल्या गुप्त माहितीनुसार, रुग्णालयावर झालेल्या या रॉकेट हल्ल्याला इस्लामिक जिहाद जहशतवादी संघटना जबाबदार आहे.
हा हवाई हल्ला मध्य गाझातील अल अहली रुग्णालयावर झाला. हे गाझा पट्टीतील शेवटचे ख्रिश्चन रुग्णालय असल्याचे सांगण्यात जाते. इस्रायली सैन्याने मंगळवारी रात्री अल अहली अरबी बापटिस्ट रुग्णालयावर एअरस्ट्राइक केल्याचा दावा गाझा आरोग्य मंत्रालयाने केला होता. या रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर जखमी आणि इतर पॅलेस्टाईनच्या नागरिकांनी आसरा घेतला होता.