इस्राइल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे गाझापट्टी होरपळून निघत आहे. दरम्याना, इस्राइलचे संरक्षणमंत्री योव गॅलेंट यांनी गाझाबाबत मोठं आणि सूचक विधान केलं आहे. त्यांनी सांगितले की, दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्राइलची सुरक्षा दले हमासच्या तळांवर पूर्ण हल्ला करण्याच्या दिशेने दिशेने जात आहेत. द टाइम्स ऑफ इस्राइलमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
गाझा सीमेवर तैनात सैनिकांना संबोधित करताना इस्राइलच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, मी सर्व निर्बंध हटवले आहेत. आम्ही आपल्या भागावर नियंत्रण प्रस्थापित केले आहे. तसेच आता आम्ही पूर्ण हल्ल्याच्या दिशेने जात आहोत. मात्र आता गाझा कधीही आपल्या पूर्वस्थितीत जाऊ शकत नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
इस्राइली संरक्षण मंत्र्याच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इस्राइलने सांगितले की. तुमच्याजवळ येथील परिस्थिती बदलण्याची क्षमत असेल. तुम्ही किंमत चुकवली आहे. आता तुम्हाला बदल पाहायला मिळेल. हमासला गाझामध्ये बदल हवा होता. त्यांनी सांगितले की, त्यांना आता या वेळेबाबत पश्चाताप होत असेल. गाझा कधीही त्या स्थितीमध्ये पोहोचू शकणार नाही, जिथे हा भाग आधी होता.