शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

हृदयद्रावक! गाझाच्या सर्वात मोठ्या रुग्णालयाची रुग्णांना जिवंत ठेवण्यासाठी धडपड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 10:05 AM

Israel Palestine Conflict : गाझा पट्टीत इस्रायली सैन्य सातत्याने हल्ले करत आहे. पण या सगळ्यात गाझा पट्टीतील रुग्णालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

इस्रायली सैन्य हमासचा खात्मा करण्यासाठी गाझा पट्टीत आपली ग्राउंड ऑपरेशन चालवत आहे. मात्र या कारवाईमुळे गाझा पट्टीतील रुग्णालयांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना वाचवण्यासाठी आवश्यक औषधांचाही तुटवडा आहे. गाझा पट्टीत इस्रायली सैन्य सातत्याने हल्ले करत आहे. पण या सगळ्यात गाझा पट्टीतील रुग्णालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अशी अनेक रुग्णालये आहेत जिथे रुग्णांना जिवंत ठेवण्यासाठी खूप धडपड करावी लागत आहे. 

इस्रायलने गाझा पट्टीच्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलवर गोळीबार केल्याच्या वृत्ताचे ठामपणे खंडन केले आहे, परंतु त्यांचे सैन्य अल-शिफाजवळ हमासच्या कार्यकर्त्यांशी लढत असल्याचं म्हटलं आहे. सैन्याचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी टेलिव्हिजन ब्रीफिंगमध्ये सांगितलं की, "गेल्या काही तासांमध्ये, आम्ही अल-शिफा हॉस्पिटलला घेरलं आणि हल्ला करत आहोत अशी खोटी माहिती पसरवली गेली आहे. हे खोटे अहवाल आहेत."

पॅलेस्टिनी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन नवजात बालकांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता आणि विजेच्या कमतरतेमुळे इनक्यूबेटरमध्ये असलेल्यांना धोका आहे. हमासचा खात्मा करण्यासाठी इस्रायलचे लष्कर गेल्या अनेक दिवसांपासून गाझा पट्टीत जोरदार गोळीबार आणि बॉम्बफेक करत आहे. मदत संस्था आणि रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी सांगितले आहे की परिस्थिती आधीच भयंकर आहे कारण औषधे आणि इंधनाची तीव्र कमतरता आहे. 

इस्रायलने सांगितलं की, गाझामधून दक्षिण इस्रायलमध्ये अजूनही रॉकेट डागले जात आहेत, जिथे गेल्या महिन्यात हमासने सुमारे 1,200 लोक मारले आणि 200 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले होते. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितलं की 7 ऑक्टोबरपासून गाझामधील 11,078 रहिवासी हवाई आणि रॉकेट हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत, त्यापैकी सुमारे 40 टक्के मुलं आहेत.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या देशाची गाझा पुन्हा ताब्यात घेण्याची कोणतीही योजना नाही. ते म्हणाले की, आम्हाला गाझावर राज्य करायचं नाही. आम्हाला ते ताब्यात घ्यायचं नाही, परंतु आम्हाला त्यांना एक चांगले भविष्य द्यायचं आहे. युद्धामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध