शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

मशीद अन् शाळेतून दहशतवाद्यांचे रॉकेट हल्ले; हमासच्या ठिकाणांवर कब्जा करत इस्रायलनं पुरावेच दाखवले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 10:04 AM

इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हमास शाळा आणि मशिदीचा वापर रॉकेट लॉन्च सेंटर म्हणून करत होते.

हमासने 7 ऑक्टोबरला इस्रायलवर मोठा दहशतवादी हल्ला केला. यानंतर इस्रायलने हमास विरोधात थेट युद्धाचा बिगूल वाजवला आणि गाझामध्ये जबरदस्त हवाई आणि जमिनीवरील हल्ले करायला सुरुवात केली. गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या इस्रायलच्या या प्रत्युत्तरात आतापर्यंत 10 हजारहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. इस्रायली ग्राउंड फोर्सेस गाझातील हमासच्या ठिकानांना लक्ष्य करत आहेत. अनेक ठिकाणी तर इस्रायली लष्कराने कब्जाही केला आहे. हमास या ठिकाणांचा वापर रॉकेट हल्ले करण्यासाठी करत होता. इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हमास शाळा आणि मशिदीचा वापर रॉकेट लॉन्च सेंटर म्हणून करत होते. यासंदर्भात इस्रायलच्या लष्कराने दोन व्हिडिओ देखील जारी केले आहेत. यातील पहिल्या व्हिडिओमध्ये इस्रायली सैनिक एका शाळेची इमारत दाखवत आहे. या शाळेच्या भिंतिंवर मुलांच्या पेंटिंग देखील आहेत. इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, हमाचे दहशतवादी या शाळेचा वापर इस्रायलवर हल्ला करण्यासाठी करत होते. 

इस्रायली लष्कराने जारी केलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, एक उद्ध्वस्त इमारत दिसत आहे. ही इमारत एका मशिदीची असून यात इस्रायलवर हल्ला करण्याच्या दृष्टीने रॉकेट लाँचर्स बसविण्यात आले असल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. 

गाझाचा जगाशी संपर्क तोडला -इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात १० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्याने सोमवारी पहाटे संपूर्ण गाझा शहराला वेढा घात हमासचा वरचष्मा असलेल्या उत्तर गाझाचा तेथील अन्य ठिकाणांसोबत असलेला संपर्क तोडला आहे. इस्रायलने कोंडी केल्यामुळे गाझामध्ये इंधन, औषधी, अन्नधान्य अशा जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. तेथील शाळांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अख्यत्यारीतील संघटनांनी मदत छावण्या सुरू केल्या आहेत. 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षwarयुद्धDeathमृत्यू