शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

भयंकर! गाझा युद्धात इस्रायली सैनिकांची मोठी चूक; आपल्याच 3 नागरिकांवर झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 11:27 AM

Israel Hamas War : इस्रायली संरक्षण दलाने (IDF) 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर हमासने ओलीस ठेवलेल्या त्यांच्याच तीन नागरिकांकडून धोका आहे असं समजून गोळीबार केला.

गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायली संरक्षण दलाने मोठी चूक केली. टाईम्स ऑफ इस्रायलने IDF चे प्रवक्ते डेनियल हगारी यांनी म्हटलं आहे की, इस्रायली संरक्षण दलाने (IDF) 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर हमासने ओलीस ठेवलेल्या त्यांच्याच तीन नागरिकांकडून धोका आहे असं समजून गोळीबार केला. या घटनेत तिन्ही नागरिकांचा मृत्यू झाला. आयडीएफ या दुःखद घटनेची जबाबदारी घेतं असं डेनियल हगारी यांनी म्हटलं आहे. 

ही घटना त्याच भागात घडली जिथे इस्रायली सैनिकांनी आत्मघातकी हल्लेखोरांसह अनेक दहशतवाद्यांचा सामना केला. तीन इस्रायली ओलीसांपैकी दोघांची ओळख योतम हॅम आणि समर तलाल्का अशी झाली आहे. हॅमला केफार अजाकडून ओलीस ठेवण्यात आले होते आणि समर तलल्काचे निराआमकडून अपहरण करण्यात आलं होतं. हगारीने आपल्या कुटुंबाच्या विनंतीवरून तिसऱ्या ओलीस ठेवलेल्या व्यक्तीचं नाव जाहीर केलं नाही.

हमासच्या बंदिवासातून तीन ओलीस कसे सुटले, असे विचारले असता हगारी म्हणाले की, लष्कराचा असा विश्वास आहे की "तिघेही पळून जाण्यात यशस्वी झाले किंवा दहशतवाद्यांनी त्यांना सोडलं." आयडीएफच्या प्रवक्त्याने सांगितलं की, गोळीबारानंतर तीन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतांच्या ओळख पटवण्यात आली. त्यांचे मृतदेह ताबडतोब तपासणीसाठी इस्रायलला हलवण्यात आले, जिथे हमासने ओलीस ठेवलेले इस्रायली नागरिक म्हणून त्यांची ओळख पटली.

डेनियल हगारी म्हणाले, ही आपल्या सर्वांसाठी दुःखद आणि वेदनादायक घटना आहे आणि जे घडले त्याला IDF जबाबदार आहे. आयडीएफ आपच्या सैनिकांनी केलेल्या या गंभीर चुकीची कारणं शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आयडीएफने तातडीने या घटनेचा तपास सुरू केला. ही एक दु:खद घटना आहे, जी युद्धक्षेत्रात घडली आहे जिथे सैनिकांनी अलीकडच्या काळात आणि आजही अनेक दहशतवाद्यांचा सामना केला आहे आणि संघर्ष केला आहे.

आयडीएफच्या प्रवक्त्याने सांगितलं की, अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यात आमच्या सैनिकांना हमासच्या आत्मघाती हल्लेखोरांचा सामना करावा लागला आहे. असेही हल्ले झाले ज्यात दहशतवाद्यांनी आमच्या सैन्याला आमिष दाखवून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. या दुःखद घटनेनंतर काही वेळातच दहशतवाद्यांसोबत आणखी एक चकमक झाली. आयडीएफ याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करतं आणि मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील होतो. आम्ही तिन्ही मृतांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी प्रार्थना करतो. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायल