इस्रायल आणि दहशतवादी संघटना असलेल्या हमास यांच्यात गेल्या 17 दिवसांपासून तुंबळ युद्ध सुरू आहे. इस्रायल हमासवर जबरदस्त मिसाइल हल्ले करत आहे. यातच, रविवारी आम्ही हमासवर पहिल्यांदाच ‘आयरन स्टिंग’ मोर्टार हल्ला केल्याचे इस्रायलच्या संरक्षण दलाने म्हटले आहे.
द जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, गाझा पट्टीमध्ये हा घातक मोर्टार हल्ला करण्यात आला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध आता आणखीनच घातक होताना दिसत आहे. गाझा शहरात सर्वत्र हाहाकार आहे. या युद्धात सातत्याने होत असलेल्या बॉम्ब आणि रॉकेटच्या वर्षावात गाझातील अनेक इमारती भूईसपाट झाल्या आहेत. यातच इस्रायलने रविवारी पहिल्यांदाच ‘आयरन स्टिंग’ मोर्टार डागल्यानंतर, हमासच्या दहशतवाद्यांमध्ये हाहाकार माजला आहे.
किती घातक आहे 'आयरन स्टिंग' मोर्टार? -माध्यमातील वृत्तानुसार, ‘आयर्न स्टिंग’चा शोध एल्बिट सिस्टीमने लावला होता. यासंदर्भात 2021 मध्ये सर्वप्रथम इस्रायलमध्ये संरक्षण मंत्रालय, IDF ग्राउंड फोर्सेस आणि एल्बिट यांनी याचा खुलासा केला होता. सर्वसामान्य नागरिकांना इज पोहोचण्याची शक्यता कमी करण्यासाठी. आपल्या निश्चित टार्गेटचा वापर करत मोर्टार मोकळ्या जागा तसेच शहरी वातावरणात वापरण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
GPS चा वापर -या मोर्टारला GPS सिस्टिम देण्यात आले आहे. याच्या माध्यमाने लक्ष्याचा अचूक वेध घेता येतो. अचूक हल्ला चढवण्यासाठी यात लेजरचाही उपयोग केला जातो. याची रेन्ज साधारणपणे 1 ते 12 किलोमीटर एवढी आहे.