इस्रायल-हमास युद्धात अनेक देश आणि अतिरेकी संघटनांनीही उडी घेतली आहे. एकीकडे इराण, जॉर्डन, इजिप्तसह अनेक देश पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्याचबरोबर अनेक अतिरेकी आणि दहशतवादी संघटनाही हमासला उघडपणे पाठिंबा देत आहेत. यामध्ये आता पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा हमासच्या बाजूने मोठा प्लॅन तयार करत असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये ISI ने मदत केली आहे, ज्याला "हमास सपोर्ट प्लान" असं नाव देण्यात आलं आहे.
पीओकेमध्ये असलेल्या दहशतवादी छावण्यांमधून दहशतवादी पॅलेस्टाईनमध्ये जाण्याचा विचार करत असून हमासला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. इस्रायलवरील हल्ल्याच्या अवघ्या 4 दिवसांनंतर म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी गुप्तचर यंत्रणांना पीओकेमध्ये उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांच्या लॉन्चिंग पॅडमध्ये दहशतवाद्यांच्या हालचालींद्वारे हे महत्त्वाचे इनपुट मिळाले. या हालचाली बहुतांशी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केल्या आहेत.
गुप्तचर संस्थांच्या मते, पीओकेमधून सुरू असलेल्या या कॅम्पमधील दहशतवादी प्रथम पीओकेमधून तुर्कीमध्ये जात आहेत, तेथून ते हमासच्या समर्थनार्थ इस्रायली सुरक्षा दलांविरुद्ध भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. सध्या पीओके सोडून गेलेले हे दहशतवादी फ्रंटलाईनवर काम करत नसून हमासच्या बॅक एंड सपोर्ट सिस्टमसाठी काम करत आहेत. यामध्ये लॉजिस्टिक मूवमेंट आणि आरिटिलरी डिपार्टमेंटचा समावेश आहे.
हे इंटेलिजन्स इनपुट मिळाल्यानंतर सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून या सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला 24 दिवस झाले असून, यामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूंनी 9700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. hindi.news18.com ने याबाबतचे वृत्त दिले आहे.