Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्ध काही केल्या शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. युद्ध सुरू होऊन आता २० दिवस झाले, तरीही युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसत आहेत. तशताच इस्रायलच्या हवाई दलाचे गाझा पट्टीवर भयंकर हल्ले सुरूच आहेत. या हवाई हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझा रिकामा करण्याचा इशारा दिल्यानंतर इस्रायली लष्कराने गाझावरील हवाई हल्ले तीव्र केले आहेत. इस्रायली सरकारने बुधवारी सांगितले की, पॅलेस्टिनी गट हमासने पकडलेल्या अंदाजे 220 ओलिस नागरिकांपैकी अर्ध्याहून अधिक लोक हे परदेशी आहेत.
४० देशांतील ३२८ लोक मृत, बेपत्ता; अनेकांकडे परदेशी पासपोर्ट
इस्रायलने असा दावा केला आहे की, हमासने ओलिस ठेवलेल्यांपैकी ५४ थाई नागरिकांसह २५ वेगवेगळ्या देशांचे परदेशी पासपोर्ट आहेत. तसेच, रॉयटर्सच्या वृत्तात अद्ययावत आकडेवारीनुसार, दक्षिण इस्रायलवर हमासच्या सैनिकांनी ७ ऑक्टोबरला केलेल्या अचानक हल्ल्यानंतर ४० देशांतील ३२८ लोक मृत आणि बेपत्ता झाल्याची पुष्टी झाल्याचेही सरकारने म्हटले आहे. या हल्ल्यात एकूण १४०० लोक मारले गेले आहेत.
‘१३८ ओलिसांकडे परदेशी पासपोर्ट’
इस्रायलने सांगितले की, १३८ ओलिसांकडे विदेशी पासपोर्ट होते, ज्यात १५ अर्जेंटिनाचे, १२ जर्मनीचे, १२ अमेरिकन, सहा फ्रेंच आणि सहा रशियन नागरिक आहेत. याशिवाय अनेकांना दुहेरी इस्रायली नागरिकत्व असल्याचे मानले जात आहे. त्यात काही थाई आणि पाच नेपाळी ओलिस आहेत असा अंदाज आहे. तसेच एक चिनी, एक श्रीलंकन, दोन टांझानियन आणि दोन फिलिपिनो यांनाही ओलीस ठेवण्यात आले होते.
थायलंडच्या नागरिकांचा परदेशी मृत आणि बेपत्ता लोकांचा सर्वात मोठा सिंगल ग्रुप तयार केला आहे, ज्यामध्ये २४ मृत आहेत आणि २१ बेपत्ता असल्याची पुष्टी झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, थायलंड हा इस्रायलमध्ये स्थलांतरित कामगारांचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. त्यांचे सुमारे 30,000 लोक कृषी क्षेत्रात काम करतात.