हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धादरम्यान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना आपल्याच देशात घेरण्यात आलं आहेत. राजधानी तेल अवीवमध्ये शुक्रवारी रात्री हजारो लोकांनी नेतन्याहू सरकारच्या विरोधात रॅली काढली. आंदोलकांनी इस्रायलमध्ये तात्काळ निवडणुका घेण्याची मागणी केली आणि सरकार केवळ स्वतःच्या फायद्यासाठी काम करत असल्याचं म्हटलं आहे. यावेळी काही आंदोलकांनी जाळपोळही सुरू केली.
इतर आंदोलक देशभक्तीपर गाणी गात होते आणि नेतन्याहू यांच्यावर टीका करणारे फलक हातात होते. ही निदर्शने एकाच ठिकाणी झाली नसून शहराच्या इतर भागातही झाली. इतरत्र आयोजित केलेल्या निषेधादरम्यान, लोकांनी हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करण्यासाठी सरकारने आणखी काही करण्याची मागणी केली आणि 'ओलिसांना घरी आणा' अशा घोषणा दिल्या.
हमाससोबतच्या युद्धविरामासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये सातत्याने निदर्शने होत आहेत. हमास प्रकरणाबाबत इस्रायलच्या एका वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि लोक या सर्व गोष्टींसाठी पंतप्रधान नेतन्याहू यांना जबाबदार धरत आहेत. नेतन्याहू यांनी हमासला संपवण्याची शपथ घेतली आहे.
हमास ओलिसांची सुटका करेपर्यंत युद्धविराम मागे घेतला जाणार नाही, असं नेतन्याहू यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. इस्रायल आपले हल्ले सुरूच ठेवणार आहे. कारण हे हमाससमोर गुडघे टेकण्यासारखे होईल. पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायली हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यांनी गाझाचा बहुतांश भाग उद्ध्वस्त केला आहे, ज्यात बहुतांश नागरिकांसह 28,775 लोक मारले गेले आहेत.