हमासच्या दहशतवाद्यांनी गाझामधून इस्रायलमध्ये तीन हजाराहून अधिक रॉकेट्स डागून हल्ला केल्यानंतर इस्रायल आणि गाझामध्ये आतापर्यंत 1000 हून अधिक लोक ठार झाले आहेत. याला जोरदार प्रत्युत्तर देताना इस्रायली संरक्षण दलांनी गाझामध्ये हल्ला केला. हमासच्या दहशतवाद्यांनी आतापर्यंत बर्याच नागरिकांचे अपहरण केले आहे आणि अनेक लोकांना ठार मारले आहे. यानंतर इस्रायलनेही भयंकर युद्ध घोषित केलं आहे.
रविवारी, शेकडो इस्रायली त्यांच्या बेपत्ता कुटुंबातील सदस्यांची माहिती मिळविण्यासाठी मध्यवर्ती पोलीस स्टेशनमध्ये जमले. इस्रायली सरकारच्या म्हणण्यानुसार, गाझा येथे हमासच्या दहशतवाद्यांनी 100 हून अधिक लोकांना पकडले आहे. तथापि, हरवलेल्या लोकांची नेमकी संख्या किती आहे, हे अद्याप सांगता येणार नाही.
1000 हून अधिक मृत, 2300 पेक्षा जास्त जखमी
युद्धाच्या दुसऱ्या दिवशी, इस्रायली सैन्य आणि हमास या दहशतवादी गट यांच्यात झालेल्या चकमकीमुळे देशभरातील बर्याच भागावर याचा परिणाम झाला. इस्रायलवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर, इस्रायलमधील सैनिकांसह किमान 700 इस्त्रायली ठार झाले आहेत आणि 1,900 हून अधिक जखमी झाले आहेत. गाझा पट्टीमध्ये इस्रायली काउंटरच्या हल्ल्यानंतर 450 हून अधिक मृत्यू झाले आणि सुमारे 2,300 जखमी झाले, ज्यामुळे एकूण मृत्यू 1000 पेक्षा जास्त झाले.
इस्रायली पर्यटकांवर गोळीबार
इजिप्तच्या अलेक्झांड्रिया शहरातील इस्रायली पर्यटकांच्या गटावर एका पोलीस अधिकाऱ्याने गोळीबार केलाय याच दोन इस्रायलींचा मृत्यू झाला. स्थानिक मीडियाच्या अहवालात एक जण जखमी झाल्याचं म्हटलं आहे. अलेक्झांड्रियामधील ऐतिहासिक पोम्पी स्तंभाजवळ ही घटना घडली. सुरक्षा दलांनी या भागात घेरलं आणि संशयित हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.
हमास दहशतवाद्यांच्या ताब्यात थायलंडचे 11 नागरिक
थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सांगितले की, हमासच्या दहशतवाद्यांनी आपल्या 11 नागरिकांना पकडलं आहे. टाइम्स ऑफ इस्रायलच्या अहवालानुसार, त्यांना गाझा येथे नेले गेले असावे असे संकेत आहेत. बँकॉक पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, थाय पंतप्रधान श्रीथा थाविसिन यांनी सांगितले की, "ते निर्दोष आहेत आणि कोणत्याही संघर्षाशी काही संबंध नाही." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.