शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

'तुम्ही हमासला सांभाळा, बाकी सारं आम्ही बघतो..'; अमेरिकेचा इस्रायलला खंबीर पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 6:21 PM

युद्धात नागरिकांचे रक्षण करण्यासाठी लागेल ती मदत करण्याचे अमेरिकेचे इस्रायलला आश्वासन

Joe Biden USA, Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या तीन दिवसांपासून हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत. या युद्धाची झळ हळूहळू जगभरात बसण्याची शक्यता आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या युद्धात हमासविरोधात दंड थोपटले आहेत. अमेरिकेचा जवळचा मित्र असलेल्या इस्रायलसोबत आपण ठामपणे पाठिशी उभे आहोत असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने इस्रायलला मोठ्या प्रमाणावर शस्त्रे पाठवली आहेत. बायडेन म्हणाले आहेत की, संकटाच्या काळात अमेरिकन जनता इस्रायलच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. ते म्हणाले, 'अमेरिकेला स्पष्टपणे इस्रायलच्या लोकांना, संपूर्ण जगाला आणि जगभरात उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांना सांगायचे आहे की आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत आणि आमचा विचार कधीही बदलणार नाही.'

एकीकडे बायडेन यांनी उघडपणे इस्रायलला पाठिंबा जाहीर केला आहे, तर दुसरीकडे इस्रायली सैन्य हमासवर कठोरपणे प्रतिहल्ले करत आहे. बायडेन यांनी ट्विट केले, "इस्रायल स्वतःचे रक्षण करू शकेल याची खात्री करण्यासाठी अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटन नेहमीच एकजुटीने उभे राहतील आणि एकमेकांशी समन्वय साधतील. आमचा मित्र इस्रायल याच्या पाठीशी आम्ही आहोत. मी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना आश्वासन देतो की युनायटेड स्टेट्स हे सुनिश्चित करत राहील की इस्रायलला स्वतःचे आणि आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ते सारं काही मिळेल. ही अतिशय संवेदनशील वेळ असून अमेरिकन जनता इस्रायलच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे." दरम्यान, इराणकडून इस्रायलवर हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन अमेरिकेने हा इशारा दिल्याचे मानले जात आहे.

इस्रायली सैन्याने हमासवर हल्ला केला

अमेरिकेच्या पाठिंब्याने इस्रायली लष्कराने आता हमासवर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. इस्रायलची विमाने गेल्या ४ दिवसांपासून गाझामध्ये बॉम्बचा वर्षाव करत आहेत. इस्रायली विमाने दिवसा आणि रात्री सतत उड्डाण करत आहेत आणि हमासच्या अधिपत्याखाली असलेले दहशतवादी तळ बेचिराख करत आहेत, त्यांच्या जागा उद्ध्वस्त करत आहेत. इस्रायली सैन्याने म्हटले आहे की त्यांच्या विमानांनी हमासचे 200 तळ नष्ट केले आहेत. हमासकडून ही तळ दहशतवादी केंद्र म्हणून वापरात होती. या ठिकाणांहून इस्रायलवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात होते.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन