गेल्या तीन आठवड्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचे पडसाद आता भारतात सुद्धा उमटू लागले आहेत. अलीकडेच भारतातील केरळमध्ये हमासचा नेता खालिद माशेलने पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ रॅली काढली. खालिद मशालने या रॅलीला व्हर्च्युअली संबोधित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, हमासचा नेता खालिद माशेल याच्या रॅलीत हिंदुविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर हा वाद वाढतच गेला. दरम्यान, खालिद माशेलचे संबंध केवळ हमासशीच नाही तर कुवेत आणि जॉर्डनशीही आहेत. याचबरोबर, खालिद माशेल हा कोट्यवधींच्या मालमत्तेचाही मालक आहे.
खालिद माशेल हा हमास पॉलिट ब्युरोचा संस्थापक सदस्य आहे. याशिवाय, २०१७ पर्यंत तो अध्यक्षही होता. खालिद माशेलचा जन्म वेस्ट बँक येथे झाला. पण, त्याचे कुवेत आणि जॉर्डनशीही कनेक्शन आहे. खालिद माशेल याचे शिक्षण कुवेत आणि जॉर्डनमध्ये झाले. तो गाझामध्ये कधीही राहिला नाही. तो जॉर्डन, सीरिया, कतार आणि इजिप्तमधून काम करत होता.
कोट्यवधींची संपत्ती खालिद माशेल २००४ मध्ये निर्वासित हमासचा राजकीय नेता बनला. तसेच, खालिद माशेलची एकूण संपत्ती ४ अब्ज डॉलर आहे. भारतीय रुपयानुसार हे ३३,३६५ कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्स आणि इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, खालिद माशेल सध्या कतारमध्ये आहे.