इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अखेर मोठा निर्णय घेतला आहे. गाझा पट्टीला धडा शिकविण्याची त्यांनी घोषणा केली आणि जगात युक्रेननंतर दुसऱ्या युद्धाला सुरुवात झाली. इस्रायलवर देखील हमासकडून हल्ले होत आहेत. इस्रायलही गाझा पट्टीवर हल्ले करत आहे. हामसला अमेरिका आणि कॅनडाने दहशतवादी संघटनांच्या लिस्टमध्ये टाकले आहे.
हमासला मुस्लिम देशांचा पाठिंबा असल्याने तिसरे युद्ध छेडले जाण्याची शक्यता पुन्हा एकदा सुरु झाली आहे. सीमाभागात हमास आणि इस्रायलच्या पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरु आहे. तिकडे हमास पुन्हा मोठा हल्ला करण्याची तयारी करत आहे.
या युद्धाने पुन्हा एकदा नॉस्ट्रेदामसला खरे ठरविले आहे. या जगविख्यात भविष्यवेत्त्याने ४५० वर्षांपूर्वी त्याचे पुस्तक लेस प्रोफेटीज़मध्ये याचा उल्लेख केल्याचे सांगितले जात आहे. 2023 मध्ये मोठे युद्ध होणार असल्याचे नॉस्ट्रेदामसने म्हटले होते.
नॉस्ट्रेदामसने गेल्या 100 वर्षात जर्मनीत अॅडॉल्फ हिटलरच्या उदयापासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्यावर गोळीबार आणि 2022 मध्ये जगण्याच्या संकटापर्यंत अशा अनेक गोष्टींवर भाकिते केली होती. यापैकी बरीच खरी ठरली आहेत.
सात महिन्यांचे एक मोठे युद्ध होईल, ज्यामध्ये लोक त्यांच्या वाईट कृत्यांमुळे मरतील आणि रौएन आणि एव्हरेक्स राजाच्या अधीन राहणार नाहीत, असे नॉस्ट्रेदामसने २०२३ साठी म्हटले आहे.