इस्रायलने आज इराणवर मोठा हल्ला केला आहे. जवळपास १०० लढाऊ विमानांनी एकाचवेळी २००० किमी अंतरावर जाऊन हा हल्ला केला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडालेली असताना इस्रायलनेइराणसोबतच इराक आणि सीरियावरही हल्ले केले आहेत. इराणला जाताना वाटेत इराक लागतो. यामुळे इस्रायलने हल्ल्यांमध्ये बाधा ठरू नये म्हणून इराकची एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त केली आहे.
यामुळे इराकने पुढील आदेश येईपर्यंत सर्व विमानतळांवरील उड्डाणे रद्द केली आहेत. इराकच्या तिकरीत, बैजी, समारा, सलाह अल दीन, अल दौर आणि डियालमध्ये रॉकेट हल्ले केले आहेत. शनिवारी सकाळी ६ वाजता तिकरितमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.
इस्रायलनेइराणवर मोठा हवाई हल्ला केला आहे. जवळपास २५ दिवसांनी इराणवर मोठा हल्ला करून इस्रायलने प्रत्युत्तर दिले. इराणच्या अनेक शहरांमध्ये स्फोट झाले आहेत. दरम्यान, हल्ल्यांचा तेल प्रकल्प किंवा आण्विक साइटवर परिणाम झाला नाही. केवळ लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे, असे इराणी मीडियाने म्हटले आहे.
इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर सुमारे १८० क्षेपणास्त्रे डागली होती. यानंतर, इराणला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असे इस्रायलच्या बाजूने सांगण्यात आले होते. दरम्यान, आता इस्रायलच्या बाजूने प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली आहे. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई संरक्षण यंत्रणेने बहुतेक क्षेपणास्त्रे हवेतच पाडली.
आजचा हा हल्ला इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी मॉनिटर केला आहे. पहाटेपासूनच ते या हल्ल्यावर लक्ष ठेवून होते. नेतन्याहू यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. यामुळे त्यांनी शुक्रवारीच याची धमकी दिली होती. यानंतर लगेचच इराणवर हल्ला केला आहे.