शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
4
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
5
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
6
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
7
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
8
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
9
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
10
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
11
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
13
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
14
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
15
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
16
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
17
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
18
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
19
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
20
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश

इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 8:47 AM

Iran-Israel War : इस्रायलच्या संरक्षण दलाने या हल्ल्याला दुजोरा दिला असून, इस्त्रायली लष्कर इराणच्या लष्करी लक्ष्यांवर अनेक महिन्यांपासून इस्त्रायलच्या विरोधात सतत करत असलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हल्ले करत आहे.

Iran-Israel War :इस्रायलनेइराणवर मोठा हवाई हल्ला केला आहे. जवळपास २५  दिवसांनी इराणवर मोठा हल्ला करून इस्रायलने प्रत्युत्तर दिले. इराणच्या अनेक शहरांमध्ये स्फोट झाले आहेत. दरम्यान, हल्ल्यांचा तेल प्रकल्प किंवा आण्विक साइटवर परिणाम झाला नाही. केवळ लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे, असे इराणी मीडियाने म्हटले आहे. 

इराणने  १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर सुमारे १८० क्षेपणास्त्रे डागली होती. यानंतर, इराणला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल,  असे इस्रायलच्या बाजूने सांगण्यात आले होते. दरम्यान, आता इस्रायलच्या बाजूने प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली आहे. इराणच्या  माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई संरक्षण यंत्रणेने बहुतेक क्षेपणास्त्रे हवेतच पाडली.

इराणमधील लष्करी लक्ष्यांवर इस्रायली हल्ले स्वसंरक्षणार्थ करण्यात आले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केला होता. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हा हल्ला केला आहे, असे इस्रायली हल्ल्यांबाबत अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने म्हटले आहे. त्याचवेळी इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते सीन सेवेट यांनी सांगितले की, "लष्करी लक्ष्यांना लक्ष्य करणारे हल्ले स्वसंरक्षणार्थ आणि इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केले गेले."

दरम्यान, इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर हल्ले केले आहेत. तेहरानसह इराणमधील इतर शहरांतील लष्करी तळांवर हा हल्ला  करण्यात आला आहे. इराणच्या प्रसारमाध्यमांनी या हल्ल्याला दुजोरा दिला असून या हल्ल्यात अणु स्थळांना लक्ष्य करण्यात आले नसल्याचे म्हटले आहे. केवळ लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. तेहरानमध्ये जोरदार स्फोटांचा आवाज ऐकू   आला. इस्रायलने एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ले केले आहेत.

इस्रायलच्या संरक्षण दलाने या हल्ल्याला दुजोरा दिला असून, इस्त्रायली लष्कर इराणच्या लष्करी लक्ष्यांवर अनेक महिन्यांपासून इस्त्रायलच्या विरोधात सतत करत असलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हल्ले करत आहे. इराण आणि तेथील लोक ७ ऑक्टोबरपासून इस्रायलवर सातत्याने हल्ले करत आहेत. त्यामुळे इस्रायललाही उत्तर देण्याचा अधिकार आहे, असे  इस्रायलने म्हटले आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणInternationalआंतरराष्ट्रीय