Israel-Iran war : इस्त्रायल आणि इराणमध्ये मोठा तणाव सुरू आहे. इराणने १८० पेक्षा जास्त रॉकेटचा इस्त्रायवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे जगात खळबळ उडाली आहे. इराणच्या या पावलामुळे संपूर्ण मध्यपूर्व युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. इस्रायलने अजूनही कोणत्याही प्रत्युत्तराची कारवाई केलेली नाही, पण इस्त्रायल इराणला प्रत्युत्तर देणार आहे, त्यांच्याविरोधात मोठी कारवाई करु शकते.
इराण इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ला ही एक मोठी कारवाई म्हणून सांगत असले तरीही इस्त्रायलच्या या हल्ल्यात काहीच नुकसान झालेले नाही. इस्रायलच्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेने इराणची बहुतांश क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली. या हल्ल्यांमध्ये फक्त एकाचा मृत्यू झाला आणि तोही इस्रायली नसून पॅलेस्टिनी नागरिक होता.
इराणी क्षेपणास्त्राने मारल्या गेलेल्या व्यक्तीचे नाव समेह अल-असाली असून तो पेशाने मजूर होता, पॅलेस्टाईनमधील जेरिको शहराजवळील वेस्ट बँकच्या नुइमा गावात त्याचा मृत्यू झाला. रात्री क्षेपणास्त्र त्याच्यावर आदळले तेव्हा तो रस्त्यावरून चालला होता. जेरिको हे पॅलेस्टाईनच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले शहर आहे. जेरिको जॉर्डन खोऱ्यात वसलेले आहे, पूर्वेला जॉर्डन नदी आणि पश्चिमेला जेरुसलेम आहे.
जेरिकोचे गव्हर्नर हुसैन हुमाएल यांनी दिलेली माहिती अशी, रॉकेटचा तुकडा थेट पॅलेस्टिनी कामगारावर पडला, यात गाझा पट्टीतील जबलिया येथील रहिवासी समेह अल-असालीचा मृत्यू झाला. काही रॉकेटच्या तुकड्यांमुळे चार पॅलेस्टिनी जखमीही झाले. मिळालेल्या माहितीनुसार, तीन मुलांचा पिता असलेला अल-अस्ली हा एक मजूर आहे.त्याच्याकडे इस्रायली वर्क परमिट होते.