Israel Iran War : मागील काही महिन्यांपासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात इराणनेही उडी घेतली. इराणने काही दिवसापूर्वी इस्त्रायवर रॉकेट हल्ले केले. आता इस्त्रायलसाठी एक मोठी अपडेट समोर आली. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची भेट घेणार आहेत. तुर्कमेनिस्तानमध्ये ही बैठक होणार आहे.
पुतिन यांचे परराष्ट्र धोरणासाठीचे सहाय्यक युरी उशाकोव्ह यांनी सांगितले की, अश्गाबात येथे तुर्कमेन कवीच्या स्मरणार्थ एक समारंभ आयोजित केला असून यावेळी हे दोन्ही नेते उपस्थित असणार आहे. यावेळी दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. उशाकोव्ह म्हणाले की, द्विपक्षीय मुद्द्यांवर तसेच मध्यपूर्वेतील झपाट्याने बिघडत चाललेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरीकडे, पुतिन यांची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना भेटण्याबाबत कोणतेही सध्या प्लॅनिंग नाही.
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
व्लादिमीर पुतिन मध्यपूर्वेतील या युद्धावर लक्ष ठेवून आहेत. युक्रेनशी युद्ध पुकारले तेव्हा रशिया अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांच्या निशाण्यावर आहे. दरम्यान, या बैठकीनंतर अमेरिकेचे कट्टर शत्रू रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन उघडपणे इराणच्या बाजूने उभे राहू शकतात.
रशियाचे इराणशी जवळचे संबंध आहेत आणि इराणने मॉस्कोला ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पुरवल्याचा आरोप पाश्चात्य सरकार करत आहेत.
इस्रायलवर दुहेरी वार
इस्रायल गेल्या काही महिन्यांपासून विविध आघाड्यांवर लढत आहेत. तशातच हिज्बुल्ला आणि हमास यांनी मिळून सोमवारी इस्रायलला लक्ष्य केले. क्षेपणास्त्र आणि रॉकेटचा वापर करून झालेल्या हल्ल्यात १० जण जखमी झाले असून अनेक वाहने आणि इमारतींचे नुकसान झाले आहे. इस्रायलवर हमासच्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. हमासने हे दाखवण्याचा प्रयत्न केला की ते अजूनही इस्रायलविरुद्ध लढत आहेत. तेल अवीवच्या इस्रायलच्या सीमेजवळ गाझा येथून त्याच्या सैनिकांनी अनेक रॉकेट डागले. या हल्ल्यानंतर सायरन वाजू लागले आणि लोक बंकरच्या दिशेने धावताना दिसले.
इस्रायलचे तिसरे मोठे शहर हैफा येथे हिजबुल्लाने अनेक क्षेपणास्त्रे आणि रॉकेट्स डागली. हैफाच्या दक्षिणेस असलेल्या इस्रायली लष्करी तळावर मध्यम पल्ल्याच्या फादी-1 क्षेपणास्त्रांनी मारा केल्याचा दावा हिजबुल्लाने केला आहे. त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, हैफा येथे दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली आणि ६५ किलोमीटर दूर असलेल्या तिबेरियास शहरावर पाच रॉकेट्स पडली.