चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस आज जगभरात थैमान घालत आहे. कोरोना व्हायरस 2019च्या अखेरीस चीनमधील वुहान शहरातून पसरला. कोरनाचे स्क्रमण एवढ्या वेगाने परसले, की त्यांने अल्पावधीतच कोट्यवधी लोकांना आपल्या विळख्यात घेतले, तर लाखो लोकांना यामुळे जीव गमवावा लागला.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनापासून बचावासाठी लस तयार करण्यापूर्वी मास्क वापरणे अत्यंत महत्वाचे आहे, असे सांगितले होते. सध्या जगभरात सर्वांनाच मास्क वापरणे आवश्यक आहे. मात्र, आता इस्रायलने मास्क न लावण्याचे आदेश दिले आहेत. असा आदेश देणारा इस्रायल हा जगातील पहिलाच देश ठरला आहे.
CoronaVirus : अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह, मुख्यमंत्रीही आयसोलेट
इस्रायलमध्ये प्रशासनाने लोकांना मास्क न लावण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलमध्ये 81 टक्के लोकांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. यानंतर येथील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर येथील लोकांनी चेहऱ्यावरील मास्क काढले असून सोशल मीडियावरही आनंद व्यक्त केला आहे.
इस्रायलमध्ये 16 वर्षांवरील 81 टक्के लोकांना कोरोना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तसेच येथे लसीकरणामुळे कोरोना संक्रमितांची संख्याही वेगाने कमी झीली आहे. मात्र, असे असले तरी येथे प्रतिबंध अजूनही लागूच आहेत. येथे परदेशातून एन्ट्री तसेच लस न घेता लोकांच्या प्रवेशावर बंदी कायम आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलमध्ये नव्या भारतीय व्हेरिएन्टचे सात रुग्ण आढळून आले आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की कोरोना व्हायरसवर विजय मिळविण्याच्या बाबतीत आपण जगाचे नेतृत्व करत आहोत. तसेच, अद्याप कोरोना सोबतचे युद्ध पूर्णपणे संपलेले नाही, तो पुन्हा परतू शकतो, असेही ते म्हणाले.
देश सोडून चिनी कोरोना लस घेण्यासाठी नेपाळमध्ये का जातायत लोक? उत्तर वाचून व्हाल अवाक!
इस्रायलची लोकसंख्या एक कोटीपेक्षाही कमी आहे. तसेच येथे आतापर्यंत आठ लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर सहा हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.