इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरूच आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर देत युद्धाची घोषणा केली आहे. परिणामी, सध्या इस्रायल आणि गाझातील जमीन मृतदेह आणि ढिगाऱ्यांनी व्यापलेली आहे. रस्त्यावर फक्त रक्त आहे, आवाज, किंकाळ्या ऐकू येत आहेत. लोकांचे अश्रू थांबत नाहीत. अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.
गाझामधील सबरीन अबू दक्का हिची देखील अशीच अंगावर काटा आणणारी गोष्ट आहे. तिला वाचवण्यात यश आलं आहे. पण तिला रुग्णालयात कळलं की तिच्या तीन मुलांचा मृत्यू झाला आहे, दोन जखमी झाले आहेत आणि सहावे मूल कुठे आहे हे माहितीच नाही. कोसळलेल्या घरांच्या ढिगाऱ्यातून सबरीनची सुटका करण्यात आली.
मी घरी होते आणि अचानक मोठा आवाज आला आणि सर्व काही आमच्या डोक्यावर पडलं, माझी मुले माझ्या शेजारी होती असं तिने म्हटलं आहे. सबरीनने तिच्या मुलांना ढिगाऱ्याखालून आवाज दिला पण तिला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ढिगारा हटवण्याच काम करण्यात आलं.
पॅलेस्टाईल लोकांनी अपहरण करून गाझा पट्टीत नेलेल्या इस्रायली मुलीचे वडील सतत रडत आहेत. ते म्हणाले की, त्यांच्या मुलीसाठी ते रडत आहे. हमासच्या बंदूकधाऱ्यांनी इस्रायली शहरांमध्ये 600 लोकांची हत्या केली होती आणि अनेक लोकांचे अपहरण केले होते.
गाझामध्ये अनेकांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवलं होतं. यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. बरेच लोक इस्रायली गावांमध्ये लपून बसले आहेत, परंतु ते कुठे आहेत हे कोणालाही माहिती नाही आणि ते तिथून बाहेर पडण्याच्या स्थितीतही नाहीत. एका व्यक्तीने त्याच्या हरवलेल्या भावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.