नवी दिल्ली: इस्रायल आणि पॅलेस्टाइनदरम्यानचा संघर्ष थांबण्याचे नाव नाही. मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलने आज पुन्हा एकदा गाझा पट्टीवर जबरदस्त बॉम्बिंग केली. इस्रायली विमानांनी जवळपास 10 मिनिटे येथे बॉम्ब वर्षाव केला. जवळपास एक आठवड्यापासून हा संघर्ष सुरू आहे. हमासने गेल्या आठवड्यात जवळपास 3100 रॉकेट हल्ले केले, असा आरोपही इस्रायलने केला आहे. मात्र, इस्रायल आपल्या डिफेन्स सिस्टिमने हमासचे हल्ले निष्प्रभ करतो, म्हणजेच हमासने डागलेले रॉकेट तो आकाशातच उद्धवस्त करतो. (Israel-Palestine Conflict Israel again attacked gaza turkish president erdugan gave big warning to israel)
गाझा पट्टीत Israel ची कारवाई सुरूच; आज पुन्हा इस्रायलनं केलं १० मिनिटांपर्यंत जबरदस्त बॉम्बिंग
रजब तैयब इरदुगान यांनी दिली धमकी -पॅलेस्टाइनच्या बाजूने असलेले आणि इस्रायलच्या विरोधात असलेले अनेक मुस्लीम देश एकत्र आले आहेत. यांत तुर्की, पाकिस्तान, सौदी अरेबियासह अनेक देशांचा समावेश आहे. यात सर्वात समोर तुर्की दिसत आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब इरदुगान यांनी इस्रायलला धमकी देताना म्हटले आहे, की,"ज्या प्रमाणे सीरियाच्या सीमेजवळ दहशतवाद्यांचा मार्ग रोखला, त्याच प्रमाणे, 'मस्जिद-ए-अक्सा'च्या दिशेने सरसावणारे हातही तोडून टाकू."
OIC बैठकीत होऊ शकतो मोठा निर्णय -या मुद्द्यावर मुस्लिम राष्ट्रांची सर्वात मोठी संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑप्रेशनची (OIC) मिटिंग होत आहे. 57 मुस्लीम देश असलेल्या या संघटनेच्या बैठकीला उपस्थित असलेले सर्वच मुस्लीम देश इस्रायलच्या विरोधात एखादी मोठी रणनीती तयार करू शकतात. इस्रायल विरोधात केवळ मुस्लीमच नाही, तर इतर देशांतही आवाज उठत आहे. स्पेनमध्ये नागरिकांनी पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ निदर्शन केले. कॅनडा आणि फ्रान्समध्येही मुस्लीम धर्माच्या लोकांनी इस्रायलविरोधात रॅली काढली.
Israel Airstrike : इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझामधील मीडिया ऑफिसेसची बिल्डिंग उद्ध्वस्त
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या हिंसक संघर्षादरम्यान गाझा पट्टीत इस्रायलनं रविवारी मोठ्या प्रमाणात बॉम्बचा वर्षाव केला होता. या हवाई हल्ल्यात 42 पॅलेस्टीनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची आणि अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये काही इमारतींचेही मोठे नुकसान झाले होते.
जोवर गरज असेल तोवर कारवाई सुरूच राहिल -"या संघर्षासाठी इस्रायल जबाबदार नाही. यासाठी ते जबाबदार आहेत, ज्यांनी आमच्यावर हल्ला केला. आम्ही कारवाईच्या मध्यात आहोत. कारवाई अद्याप संपली नाही. जोवर गरज असेल तोवर ही कारवाई सुरूच राहिल," असे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटले आहे. यासंदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
"जाणूनबुजून सामान्य लोकांच्या मागे लपून त्यांना नुकसान पोहोचविण्याची हमासची भूमिका आहे. आम्ही सामान्य लोकांना कुठल्याही स्वरुपाचे नुकसान होणार नाही, यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर निशाणा साधत आहोत," असेही नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे.