Israel-Hamas War: गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल-हमास यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाची जगभरात चर्चा सुरू आहे. 7 ऑक्टोबरला सुरू झालेल्या युद्धानंतर इस्रायलकडून सातत्याने गाझावर बॉम्बफेक सुरू आहे. जगातील अनेक देशांनी युद्ध थांबवण्याचे आवाहन केला आहे, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आता प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने या युद्धावर प्रतिक्रिया आली आहे.
इस्रायलकडून गाझावर सुरू असलेल्या हल्ल्यावर अँजिलिनाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झालेले दिसत आहे. यासोबतच तिने एक लांबलचक नोट लिहिली असून त्याद्वारे गाझा हल्ल्याचा निषेध केला आहे. गाझा 'सामूहिक कबर' बनत असल्याचे तिने म्हटले आहे.
काय म्हणाली अँजेलिना?अँजेलिना जोलीने लिहिले की, “हे हल्ले मुद्दामून अडकलेल्या लोकांवर करण्यात येत आहेत, दजेणेकरुन त्यांना पळून जाता येणार नाही. दोन दशकांपासून गाझा खुले तुरुंग आणि सामूहिक कबरीसारखे बनत चालले आहे. मरण पावलेल्यांपैकी 40 टक्के लहान मुले आहेत. संपूर्ण कुटुंबांची हत्या केली जातीये आणि जग नुसत."
"अनेक देशांच्या पाठिंब्याने लाखो पॅलेस्टिनी कुटुंबांना अन्न, औषध आणि आवश्यक मदतीपासून वंचित ठेवले जात आहे. त्यांना अमानुष वागणूक दिली जात आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध आहे. युद्धविरामाची मागणी नाकारुन आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला दोन्ही बाजूंनी त्याची अंमलबजावणी करण्यापासून रोखून जागतिक नेते या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत," असंही तिने पोस्टमध्ये लिहिले.
दरम्यान, अँजेलिना जोलीपूर्वी बेला हदीदसह इतर अनेक स्टार्सनी या युद्धावर आपले मत व्यक्त केले आहे. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिनेदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.