कैरो : गाझा संकटावर शाश्वत तोडगा काढण्यासाठी इस्रायली आणि पॅलेस्टिनी संवादकांनी मंगळवारी केलेली चर्चाही निष्फळ ठरली. मात्र, पॅलेस्टिनी नागरिकांनी इस्रायली हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या इमारतींची पुनर्उभारणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गाझातील शाश्वत युद्धबंदीसाठी इजिप्तच्या मध्यस्थीने कैरोत सुरू असलेल्या चर्चेत आमचे एक शिष्टमंडळ सहभागी झाले असल्याचे हमासच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. आपली मागणी पूर्ण होईपर्यंत ७२ तासांच्या शस्त्रसंधीची मुदत वाढविण्यास हमासने नकार दिला आहे. दरम्यान, उभय पक्षांत प्रचंड मतभेद असल्याने चर्चेत कोणतीही प्रगती झाली नाही, असे एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले. (वृत्तसंस्था)
इस्रायल-पॅलेस्टाईन चर्चेत प्रगती नाही
By admin | Published: August 13, 2014 4:00 AM