हमासविरोधात इस्रायलने मोठी मोहिम उघडली आहे. इस्रायलमध्ये ब्रिटनसारखेची सर्व नागरिकांना लष्करात सेवा देणे बंधनकारक आहे. यामुळे ऐन मोक्याच्या वेळी इस्रायलकडे कमी काळात साडे तीन लाख रिझर्व्ह सैनिक जमा झाले आहेत. यामध्ये केवळ सामान्य नागरिकच नाही तर अभिनेते, अभिनेत्रींसोबत नेतेमंडळीदेखील सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी उतरले आहेत.
हमासला धडा शिकविण्यासाठी विमानतळांवर रांगा लागल्या आहेत. परदेशांत असलेले नागरिकही काम धंदा सोडून इस्रायलकडे येऊ लागले आहेत. इस्रायलच्या नेत्यांनी विरोधक आणि सत्ताधारी हा भेदभाव न ठेवता फिलिस्तानींना उध्वस्त करण्यासाठी एकत्र आले आहेत. दोन्ही बाजुंच्या नेत्यांची कॅबिनेट युद्धकाळात निर्णय घेणार आहे.
ऱिझर्व्ह सैनिक म्हणून जॉईन होणाऱ्यांमध्ये इस्रायलचे माजी पंतप्रधान बेनेट नफ्ताली देखील आहेत. त्यांनी हमासविरोधात शस्त्र हाती घेतले आहे. ड्युटीवर पोहोचताच त्यांनी सैनिकांसोबत हस्तांदोलन केले आहे. ते इस्रायलच्या डिफेंस फोर्सेसमध्ये एलिट कमांडो युनिट मटकल आणि मगलनचे कमांडो राहिले आहेत. २०१९ -२० मध्ये ते संरक्षण मंत्री देखील होते.
आणखी एक नाव मॉडेल नतालिया फदेवचे आहे. हमासविरुद्ध युद्ध लढण्यासाठी ती सैन्यात दाखल झाली आहे. नतालिया फदेव ही एक सुप्रसिद्ध ओन्ली फॅन्स मॉडेल आहे, जी अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवर युद्ध सैनिक म्हणून फोटो पोस्ट करत असते. अभिनेता इदान अमेदी सैन्यात दाखल झाला आहे. आम्ही आमच्या मुलांचे, कुटुंबाचे आणि घराचे रक्षण करण्यासाठी मैदानात उतरलो आहोत, असे ते म्हणाले.