उत्तर गाझा पट्टीतील जबलिया शहरावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात २० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत.तर अनेकजण बेपत्ता आहेत. पॅलेस्टिनी अल अक्सा प्रसारकाने शुक्रवारी ही माहिती दिली. या आठवड्याच्या सुरुवातीला, इस्रायल डिफेन्स फोर्सेसने जबलिया भागात नवीन दहशतवादविरोधी कारवाईची घोषणा केली. याआधी गुरुवारी मध्य गाझा पट्टीमध्ये विस्थापितांना आश्रय देणाऱ्या शाळेवर झालेल्या हल्ल्यात २८ पॅलेस्टिनी ठार झाले होते तर ५४ जण जखमी झाले होते.
अणु हल्ल्यातील लोकांच्या चळवळीला शांततेचे नोबेल
गाझामधील संघर्ष ७ ऑक्टोबर २०२३ रोजी दक्षिण इस्रायलवर हमासच्या हल्ल्यामुळे सुरू झाला. सुमारे १,२०० लोक मारले गेले, सुमारे २५० लोकांना ओलीस ठेवण्यात आले. हमासच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून गाझामध्ये इस्रायली लष्करी कारवायांमध्ये ४२,०६५ लोक ठार झाले आहेत आणि ९७,८८६ इतर जखमी झाले आहेत.
गुरुवारी झालेल्या हल्ल्यात इस्त्रायली सैन्याने देर अल-बालाह शहरातील पीआरसीएस मुख्यालयाजवळ असलेल्या रफिदाह शाळेला लक्ष्य केल्यानंतर पॅलेस्टाईन रेड क्रिसेंट सोसायटी संघांनी पीडितांना वैद्यकीय मदत दिली. रुग्णवाहिका कर्मचारी आणि नागरी संरक्षण दलांनी मुले आणि महिलांसह अनेक लोकांचे मृतदेह बाहेर काढले.