शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
3
मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश
4
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
5
‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’
6
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
7
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
8
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
9
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
11
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
12
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
14
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
16
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
17
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
18
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
19
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
20
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत

इस्रायलचा गाझा शहरातील शाळेवर हल्ला, ८० जण ठार; पॅलेस्टिनी आराेग्य विभागाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 1:45 PM

हल्ल्यात ४७ जण जखमी, मागील महिन्यापासून शाळांवर १७ हल्ले

देर अल-बालाह: इस्रायलने गाझा शहरातील एका शाळेवर शनिवारी पहाटे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सुमारे  ८० लोक ठार झाले, असा दावा पॅलेस्टाइनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. शाळेची वास्तू निवारा केंद्र म्हणूनही वापरली जात होती. गेल्या दहा महिन्यांत इस्रायल व हमासमध्ये सुरू असलेल्या संघर्षातील भीषण हल्ल्यांपैकी हा एक होता.

गाझा शहरातील ताबीन या शाळेवर इस्रायलच्या लष्कराने हा हल्ला केला. त्या शाळेत हमासचे कमांड सेंटर चालविण्यात येत होते, असा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलकडून गाझातील शाळांना काही दिवसांत लक्ष्य केले आहे. शनिवारी पहाटे झालेल्या हल्ल्यात शाळेची इमारत काही वेळातच उद्ध्वस्त झाली.

गाझातील अल्-अहली रुग्णालयाचे संचालक फदले नईम यांनी सांगितले की, या शाळेवर झालेल्या हल्ल्यातील सत्तरहून अधिक लोकांचे मृतदेह हाती लागले आहेत. उद्ध्वस्त शाळेच्या ढिगाऱ्याखाली अजून कोणी अडकले आहे का किंवा मृतदेह आढळतात का, याचा शोध सुरू आहे. त्या हल्ल्यात ४७ जण जखमी झाले आहेत. (वृत्तसंस्था)

मागील महिन्यापासून शाळांवर १७ हल्ले

  • गाझा येथे शनिवारी हल्ला झालेल्या शाळेच्या इमारतीत सहा हजार विस्थापितांनी आश्रय घेतला आहे. हमास व इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हजारो लोक विस्थापित झाले आहेत.
  • मागील महिन्यापासून इस्रायलने गाझातील शाळांवर १७ हल्ले केले. त्यातील सात हल्ले गेल्या आठ दिवसांत करण्यात आले आहेत. त्यात १६३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला, बालकांचा समावेश आहे.
  • गाझातील शाळांना लक्ष्य केल्याने जगभरातील मानवी हक्क संघटनांनी या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या क्रूर हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात येत आहेत. मानवी हक्क संघटनांनी देशात सुरु असलेला हा नरसंहार थांबवावा, अशी मागणी केली आहे.
टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धPalestineपॅलेस्टाइनIsraelइस्रायल