शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 5:39 AM

इस्रायलविरोधातील संघर्षात विजय मिळेपर्यंत नसरल्लाहच्या धोरणांनुसारच हिजबुल्लाह काम करत राहील, असे त्या संघटनेने सांगितले.

देर अल-बालाह : गाझा पट्टीच्या उत्तर भागात विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांनी आश्रय घेतलेल्या पाच मजली इमारतीवर इस्रायलने मंगळवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात सुमारे ६० लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महिला आणि मुले यांचे निम्मे प्रमाण आहे. ही माहिती गाझाच्या आरोग्य खात्याने दिली. 

गेल्या महिन्यात इस्रायली हवाई हल्ल्यात मारला गेलेला हिजबुल्लाह या संघटनेचा नेता हसन नसरल्लाह याच्यानंतर त्या पदावर शेख नइम कासीमची निवड करण्यात आली आहे. इस्रायलविरोधातील संघर्षात विजय मिळेपर्यंत नसरल्लाहच्या धोरणांनुसारच हिजबुल्लाह काम करत राहील, असे त्या संघटनेने सांगितले.

पॅलेस्टिनी निर्वासितांच्या मदतीसाठी यूएनआरडब्ल्यूए या संघटनेला पॅलेस्टाइन भूमीतून काम करण्यास मज्जाव करणारा कायदा इस्रायलच्या संसदेने नुकताच मंजूर केला आहे.

अतिरेक्यांशी संबंध?मदत करणाऱ्या संघटनेने दहशतवाद्यांशी हातमिळवणी केल्याचा आरोप इस्रायलकडून केला जातो. याचा संघटनेने इन्कार केला. युवकांना मारण्यासाठी इस्रायलने नवीन मार्ग शोधला आहे, असा आरोप यूएनआरडब्ल्यूएने केला. 

‘सुरूच ठेवणार’हिजबुल्लाने निवेदनात म्हटले आहे की, इस्रायलशी यापुढेही संघर्ष सुरूच ठेवण्याचे ठरविले आहे. १९८२ साली स्थापन झालेल्या हिजबुल्लाचा संस्थापक सदस्य असलेल्या शेख नइम कासीमची आता या संघटनेचा मुख्य नेता म्हणून निवड झाली आहे.

टॅग्स :Israelइस्रायलGaza Attackगाझा अटॅकIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षInternationalआंतरराष्ट्रीय