जेरूसलेम: इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरु झाले आहेत. इस्रायलचे सैन्य आणि गाझा पट्टीवर नियंत्रण असलेला पॅलेस्टिनी कट्टरपंथीय गट हमास पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. यातच आज इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामधील असोसिएट प्रेस (AP), अल जजीरा सह इतर मीडिया ऑफिसेसचे मोठे नुकसान झाले आहे. मीडिया ऑफिसेसची बिल्डिंग इस्त्रायलच्या हल्ल्यात अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहे. (israel syria border conflict live updates : international media building airstrike destroyed rockets from gaza lebanon syria tensions)
स्रायलच्या सैन्याने गाझा शहरातील काही बिल्डिंग खाली करण्याचा इशारा दिला होता. याच परिसरात असोसिएट प्रेस आणि इतर मीडियाच्या बिल्डिंग आहेत. त्यानंतर तासाभरात याठिकाणी इस्रायलने एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात 12 मोठ्या बिल्डिंग उद्ध्वस्त झाल्या. मात्र या ठिकाणच्या हल्ल्यामागचे अधिकारीक स्पष्टीकरण इस्रायलने अद्याप दिले नाही.
इस्त्रायली सैन्याने गाझामधील एपीच्या ब्युरो आणि अन्य मीडियाच्या बिल्डिंगला लक्ष्य केले. त्यामुळे मोठा धक्का बसला असून भीतीचे वातावरण आहे, असे असोसिएट प्रेसचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गॅरी प्रुइट यांनी एका निवेदनात म्हटले आहे. तर अल जजीरा जेरुसलेमचे रिपोर्टर हॅरी फॉसेट म्हणाले की, आपल्या सर्वांसाठी हा एक अतिशय वैयक्तिक क्षण आहे. हा विचार करा की, आता ती जागी नाही आहे, विचार करण्यासाठी विलक्षण आहे.
याआधी शनिवारी गाझा शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या निर्वासितांच्या छावणीवर इस्त्रायलने हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 10 जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील वाद?इस्रायलने 1967 साली मध्यपूर्वेतील युद्धानंतर जेरूसलेम ताब्यात घेतले होते. त्यानंतर इस्रायलयने हा परिसर यहुदी लोकांचा देश म्हणून घोषित केला होता. तेव्हापासून पॅलेस्टिनी नागरिक इस्रायलविरोधात संघर्ष करत आहेत. पॅलेस्टाईन स्वतंत्र होईल तेव्हा जेरुसलेम ही आमची राजधानी असेल, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, आता इस्रायलने जेरुसलेममध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांनाच बाहेर काढायला सुरुवात केली आहे.
शेख जर्राहमधून पॅलेस्टिनी नागरिकांना बाहेर काढतोय इस्रायलइस्रायलच्या सेंट्रल कोर्टाने पूर्व जेरूसलेममध्ये राहणाऱ्या चार पॅलेस्टाईन कुटुंबांना शेख जर्रा परिसरातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. कोर्टाने उजव्या विचारसरणीच्या इस्रायलींना या सर्व ठिकाणी स्थायिक होण्याचे आदेश दिले. इस्त्रायली सुप्रीम कोर्ट गुरुवारी या प्रकरणी निर्णय देणार होता. मात्र, हिंसक संघर्ष सुरू झाल्यामुळे सुनावणी १० मे पर्यंत टाळण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने इस्रायली जनतेच्या बाजूने निर्णय दिला तर पॅलेस्टाईन लोकांना आपली घरे सोडावी लागतील. या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायली पोलिसांनी बॅरियर लावले आहेत. जेणेकरून पॅलेस्टिनी नागरिक या भागात रमझानचे उपवास सोडण्यासाठी जमू नये. पॅलेस्टिनींनी इस्रायली पोलिसांच्या या कृतीवर आक्षेप घेत अधिकारांवर गदा आणली गेली असल्याचे म्हटले. तर, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे, असे सांगितले.
मुस्लिम आणि ज्यूंसाठी पवित्र आहे शेख जर्राहज्यू आणि मुस्लिम या दोघांसाठी धार्मिकदृष्ट्या शेख जर्रा प्रदेश महत्वाचा आहे. या कारणास्तव, ज्यू जेव्हा या भागात जातात तेव्हा तेथील मुस्लिमांशी त्यांचा तणाव वाढतो. असे म्हटले जाते की शेख जर्राचा इतिहास १२ व्या शतकापासून हुसाम अल दिन अल जर्राहीपासून सुरू होतो. हुसम हे तत्कालीन शक्तीशाली इस्लामिक जनरल सलादिनचे खासगी डॉक्टर होते. सलादिनच्या सैन्याने जेरुसलेवर ताबा मिळवला होता. अरबी भाषेत जर्राहचा अर्थ सर्जन होतो आणि शेख ही उपाधी आहे. ही उपाधी धार्मिक आणि समुदायाच्या नेत्याला देण्यात येते. या भागातच जर्राही यांचा मकबरा उभारण्यात आला. शेख जर्राह यांचा भाग जेरुसलेममधील उत्तर भागात आहे. याच्याजवळच हिब्रू विद्यापीठ आहे.