Israeli airstrikes on Hamas: तेलअवीव : गाझा पट्टीच्या शहरातून गेल्या तीन दिवसांत 1500 हून अधिक रॉकेटचा मारा करणाऱ्या जहाल गट हमासविरोधात इस्त्रायलने (Israel attack) जोरदार वार केला आहे. प्रत्यूत्तरादाखल केलेल्या कारवाईत हमासला (Hamas) मोठा झटका बसला आहे. त्याचे 11 कमांडर मारले गेले आहेत. या रक्तरंजित संघर्षात पॅलेस्टाइनचे 70 लोक मारले गेल्याचे समजते आहे. तर इस्त्रायलने सांगितले की, आपले 6 लोक मारले गेले आहेत. या दरम्यान संयुक्त राष्ट्रांनी इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमध्येयुद्धास तोंड फुटू शकते असा इशारा दिला आहे. (Israel on Wednesday attack fierce military offensive in the Gaza Strip, killing as many as 11 senior Hamas military figures.)
या संघर्षामध्ये ईरान समर्थक असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांकडून गाझातून रॉकेटचा पाऊस पाडण्यात येत आहे. तर दुसरीकडे इस्त्रायलची लढाऊ विमाने बॉम्ब फेक करत आहेत, तसेच तोफा धडाडू लागल्या आहेत. इस्त्रायलने बुधवारी गाझा सिटीमधील एका बहुमजली इमारतीला नेस्तनाभूत केले. यामुळे दोघांमधील हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ही इमारत कोसळल्यानंतर हमासने तेल अवीव शहराला निशाना करून सलग हवाई हल्ले केले आहेत. हे हल्ले वाढणार आहेत.
गाझाच्या आरोग्यमंत्रालयानुसार इस्त्रायलच्या हल्ल्यात मृतांची संख्या 70 झाली आहे. यामध्ये 16 मुले सहभागी आहेत. तर 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हमासने आतापर्यंत 1500 हून अधिक रॉकेट डागले आहेत. यामध्ये एक इस्त्रायलचा सैनिक ठार झाला आहे. हमासच्या हल्ल्यांची तीव्रता पाहता सध्यातरी ही संघटना थांबण्याचे नाव घेत नाहीय. त्यांच्याकडे एवढा रॉकेटचा साठा आहे की ते पुढील दोन महिने इस्त्रायलवर हल्ला सुरु ठेवू शकतात.
20 ते 30 हजार रॉकेट...इस्त्रायल सैन्याच्या अंदाजानुसार हमासकडे सध्या 20 ते 30 हजार रॉकेट आहेत. आता आम्ही हमासला कायमचे शांत करूनच थांबू, असे इस्त्रायलने ठरविले आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रांनी या दोघांमध्ये पुन्हा युद्ध सुरु होण्याचा इशारा दिला आहे.
इस्रायलची आयर्न डोम यंत्रणा काय आहे? -- शत्रू राष्ट्रांच्या हवाई हल्ल्यांपासून देशाचे रक्षण करण्यासाठी ही यंत्रणा आहे.- राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम्स आणि इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज या दोन इस्रायली कंपन्यांनी अमेरिकेच्या मदतीने ही सुरक्षा यंत्रणा विकसित केली आहे- इस्रायलच्या दिशेने येणारी क्षेपणास्त्रे, तोफगोळे आणि छोटे रॉकेट्सर्स आयर्न डोम तंत्रज्ञानाच्या साह्याने हवेतल्या हवेतच नष्ट केली जातात.- हवाई हल्ल्यांपासून आपल्या शहरांचे, नागरिकांचे रक्षण व्हावे या उद्देशाने इस्रायलने २०११ मध्ये आयर्न डोम यंत्रणेचा सुरक्षा दलांमध्ये समावेश केला- फक्त शहराच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्रांनाच नष्ट करण्यासाठी इस्रायल ही यंत्रणा वापरतो