गाझा सिटी (पॅलेस्टिनी प्रांत) - गाझा पट्टीतून रॉकेटने हल्ला केला गेल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी ‘प्रचंड हल्ल्यांचा’ निर्धार व्यक्त केल्यावर व्यापक हिंसाचाराची भीती व्यक्त केली गेली आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात किमान दोन अतिरेक्यांसह सहा पॅलेस्टिनी ठार झाल्याचे गाझातील अधिकाऱ्यांनी म्हटले. अतिरेक्यांनी इस्रायलवर शेकडो रॉकेटस्ने हल्ला केल्यावर इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात शनिवारी नव्याने संघर्ष सुरू झाला. हल्ल्यात गरोदर महिला व तिचे बाळ ठार झाल्याचा दावा इस्रायलने फेटाळून हमासने केलेल्या गोळीबारात ते मृत्यू झाल्याचा ठपका ठेवला आहे. गाझा सीमेजवळील अॅशकेलोन शहराजवळ शनिवारी रात्री झालेल्या रॉकेटच्या हल्ल्यात ५८ वर्षांचा इस्रायली पुरुष मरण पावला, असे इस्रायलच्या पोलिसांनी सांगितले. नेतान्याहू यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरुवातीलाच म्हटले की, मी रविवारी सकाळी गाझा पट्टीतील दहशतवादी घटकांवर जोरदार हल्ले सतत सुरूच ठेवा अशा सूचना लष्कराला केल्या आहेत.’ नेतान्याहू म्हणाले की, मी रणगाडे, तोफा आणि पायदळांना गाझाजवळ आधीच तैनात असलेल्या तुकड्यांसोबत तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.अवघ्या महिनाभरापूर्वी झालेल्या व अत्यंत नाजूक अशा शस्त्रसंधीत आणखी सवलतींची मागणी इस्लामिस्ट चळवळ हमासने केल्यापासूनच संघर्षाचा भडका उडाला. शनिवारपासून हमास आणि इस्लामिक जिहादने सीमेपलीकडून केलेल्या ४५० रॉकेटस् आणि तोफांच्या माऱ्यांना आम्ही हल्ल्यांनी उत्तर दिले.
गाझा पट्टीत इस्रायलचे हल्ले, सहा जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 6:13 AM