रशिया-युक्रेन युद्धादरम्यानच इस्रायलची मोठी कारवाई; पॅलेस्टाइनमधील हल्लेखोरांविरोधात उचललं असं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 02:53 PM2022-03-08T14:53:33+5:302022-03-08T14:56:00+5:30
या दोघांनी होमेश येथे ज्यू सेमिनारच्या विद्यार्थ्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. यात दोन इतर लोकही जखमी झाले होते.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच, इस्रायलने मोठा दावा केला आहे. आपल्या लष्कराने दोन पॅलेस्टिनींची घरे उद्ध्वस्त केली असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायली लष्कराने म्हटल्यानुसार, हे दोघेही गेल्या वर्षी वेस्ट बँकमध्ये झालेल्या गोळीबारातील आरोपी आहेत. मोहम्मद जरादत आणि जीत जरादत अशी या आरोपींची नावे आहेत. लष्कराने सोमवारी वेस्ट बँकमध्ये ही कारवाई केली.
या दोघांनी होमेश येथे ज्यू सेमिनारच्या विद्यार्थ्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. यात दोन इतर लोकही जखमी झाले होते. लष्कराने म्हणट्लयानुसार, डझनावर पॅलेस्टिनी दगड आणि फायर बॉम्बदेखील फेकत होते. तसेच या लोकांनी ग्रेनेडनेही हल्ला केला. मात्र, सुदैवाने कुठल्याही जवानाला कसल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. यानंतर फायरिंग करत या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यात आले.
यासंदर्भात बोलताना इस्रायली अधिकारी म्हणाले, पुढील हल्ले रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जेरुसलेम येथे रविवारी एका पॅलेस्टिनीने दोन पोलीस अधिकाऱ्यांवर चाकूने वार केला होता. यानंतर पोलिसांनी त्याला ठार केले. अशीच आणखी एक दुसरी घटनाही समोर आली आहे. एका 19 वर्षीय पॅलेस्टिनीने पोलिसांवर हल्ला केला यानंतर पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या.
इस्रायलने 1967 च्या युद्धानंतर, जेरुसलेम, वेस्ट बँक आणि गाजा पट्टीवर कब्जा केला होता. अनेक देशांनी ईस्ट जेरुसलेमला इस्रायली मान्यता दलेली नव्हती. वेस्ट बँक आणि गाझा या दोन्ही भागांना स्वतंत्र करण्याची पॅलेस्टिनी लोकांची इच्छा आहे. कारण ते ईस्ट जेरुसलेमला आपली राजधानी मानतात.