शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
3
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
4
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
5
"जिवंत राहिले तर आवश्य कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
6
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
7
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
8
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
9
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
10
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
11
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
12
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
13
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
14
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
15
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
16
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
17
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
18
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
19
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
20
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही

५ महिन्यांपूर्वीच पेरली पेजरमध्ये स्फोटके; हिजबुल्लाहसाठी मोसादने असा आखला होता प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 9:00 AM

बनॉनमध्ये पेजर्सचा अचानक स्फोट होऊ लागल्याने हजारो लोक एकाच वेळी या स्फोटाचे बळी ठरले.

Hezbollah Pagers Blast : लेबनॉनमध्ये मेसेजसाठी वापरल्या जाणाऱ्या शेकडो पेजरमध्ये एकाच वेळी स्फोट झाल्याने खळबळ उडाली. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला तसेच ३ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी बहुतांश हिजबुल्लाचे सदस्य आहेत. या स्फोटासाठी इस्रायलला जबाबदार धरले जात असून हे पेजर तैवानमध्ये तयार करण्यात आले होते, ज्याच्यावर इस्रायलमधून नियंत्रण केले जात होते असे म्हटलं जात आहे. डिव्हाइस हॅकिंग आणि इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद आणि पेजर उपकरणे बनवणारी कंपनी यांच्यात संबंध असल्याचा दावा केला जात आहे.

लेबनॉनमध्ये मंगळवारी दुपारी घडलेल्या घटनेने फक्त इराण समर्थित हिजबुल्लाह अतिरेकीच नाही तर संपूर्ण जग हादरले. लेबनॉनमध्ये पेजर्सचा अचानक स्फोट होऊ लागल्याने हजारो लोक एकाच वेळी या स्फोटाचे बळी ठरले. हा हल्ला इतका मोठा होता की ९ लोकांचा मृत्यू झाला आणि ३००० लोक जखमी झाले. जखमींमध्ये इराणच्या लेबनॉनमधील राजदूताचाही समावेश आहे. इस्त्रायली हल्ले टाळण्यासाठी हिजबुल्लाहचे सदस्य फोनऐवजी पेजर वापरतात. इस्रायलने या हल्ल्यासाठी तंत्रज्ञानात कालबाह्य समजल्या जाणाऱ्या पेजरचा वापर केला. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने वापरात येण्यापूर्वी या पेजरशी छेडछाड केल्याचे दिसून येते, ज्यामुळे त्यांचा एका विशिष्ट वेळी स्फोट झाला.

मंगळवारी सीरियामध्ये जवळपास एकाच वेळी १०० बॉम्बस्फोटांची नोंद झाली आहे. आता इस्रायलच्या मोसाद गुप्तहेर संस्थेने या स्फोटाच्या पाच महिने आधी लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाहने ऑर्डर केलेल्या ५००० तैवान-निर्मित पेजरमध्ये थोड्या प्रमाणात स्फोटके पेरल्याचे दावा केला जात आहे. मोसादने डिव्हाइसमध्ये एक बोर्ड बसवला होता ज्यामध्ये स्फोटक सामग्री होती आणि त्याला कोड दिलेला. कोणत्याही माध्यमाने ते शोधणे खूप कठीण आहे. कोणत्याही डिव्हाइस किंवा स्कॅनरसह देखील त्याचा शोध घेऊ शकत नाही," अशी लेबनॉन सुरक्षा यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

दरम्यान, या हल्ल्यानंतर काही वेळ हिजबुल्लाला काय झालं ते समजले नाही. मात्र, नंतर त्यांनी निवेदन जारी करत यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आणि बदला घेण्याची धमकी दिली. हिजबुल्लाहच्या जवळच्या स्त्रोताने नाव न सांगण्याच्या अटीवर एएफपीला सांगितले की स्फोट झालेले पेजर हिजबुल्लाहने आयात केलेल्या अलीकडील शिपमेंटचा भाग होते. यामध्ये छेडछाड झाल्याचे बोलले जात आहे. हे पेजर्स हिजबुल्लाह अतिरेक्यांना देण्यापूर्वी मोसादच्या हेरांपर्यंत पोहोचले होते.

या पेजर्सच्या बॅटरीवर मोसादने पीईटीएन हा अत्यंत स्फोटक पदार्थ ठेवल्याचे म्हटलं जात आहे. मंगळवारी हे पेजर हॅक करून त्यांचे तापमान वाढवून बॅटरी एकाच वेळी फोडण्यात आल्या. प्रत्येक पेजरमध्ये २० ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे स्फोटक होते. ज्या पेजर्सचा स्फोट झाला होता ते नुकतेच हिजबुल्लाहने खरेदी केले होते. हिजबुल्लाचा नेता नसरल्लाह याने गटाच्या मोबाईल न वापरण्याचे आदेश दिले होते ज्यामुळे इस्रायली गुप्तचर संस्था त्याचा माग काढू शकतात.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराण