शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

राष्ट्रपतींचे इस्रायली संसदेत शलोम-नमस्ते

By admin | Published: October 14, 2015 11:31 PM

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इस्रायलची संसद नेसेटमध्ये भाषण करून एक नवा इतिहास रचला आहे. भारत आणि इस्रायल यांनी आपले मैत्रीसंबंध कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक बळकट करण्याची गरज

जेरुसलेम : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इस्रायलची संसद नेसेटमध्ये भाषण करून एक नवा इतिहास रचला आहे. भारत आणि इस्रायल यांनी आपले मैत्रीसंबंध कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक बळकट करण्याची गरज त्यांनी या भाषणातून प्रकर्षाने मांडली.हिब्रूमध्ये नमस्काराला असणाऱ्या शलोम आणि भारतीय नमस्ते अशा दोन शब्दांनी भाषणाची सुरुवात करून राष्ट्रपतींनी उपस्थित संसद सदस्यांची मने जिंकली. आपल्या भाषणामध्ये मुखर्जी यांनी इस्रायलने शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या प्रगतीची वाहवा केली. भारत व इस्रायलने शेती व औद्योगिक क्षेत्रात एकत्र प्रयत्न करायला हवेत असेही सांगितले. २००० वर्षांपूर्वी ज्यू धर्मीय भारतामध्ये आले आणि भारतीय समाजात मिसळून समजाचा एक भाग बनून गेले याचा उल्लेखही त्यांनी केला. नेसेटमध्ये भाषण देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती झाल्यामुळे आपण सन्मानित झालो आहोत असेही ते म्हणाले. मात्र, राष्ट्रपतींनी भाषणात पॅलेस्टाईनचा एकदाही उल्लेख केला नाही. इस्रायलभेटीमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी माऊंट हर्झेलवरच्या होलोकॉस्ट मेमोरियलमध्ये जाऊन श्रद्धांजलीही अर्पण केली. (वृत्तसंस्था)हुमुस आणि हमासहुमुस हा मध्यपूर्व आणि इस्रायलमध्ये आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हुमुस भारतीय लोकांना फार आवडतो असे विधान केले. मात्र हुमुसचा उच्चार हमास (पॅलेस्टाईनमधील संघटना) असा केल्यामुळे इस्रायली खासदार एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. पण राष्ट्रपतींना हुमुस म्हणायचे असल्याचे समजताच क्षणातच त्यांचे समाधान झाले.दहशतवाद हा कोणत्याही प्रकारे थांबविलाच पाहिजे. भारतीय लोकांचे इस्रायलमध्ये नेहमीच स्वागत होईल अशा सकारत्माक वाक्यावर नेत्यानाहू यांनी भाषण संपविले.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणात पॅलेस्टाईनचा उल्लेख केला नसला तरी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी सर्व भाषण पॅलेस्टाईन पुरस्कृत दहशतवादावरच केले. अल अक्सा मशीद आम्ही उद्ध्वस्त करणार अशा खोट्या बातम्या परसरवल्या जात आहेत. पॅलेस्टाईनची अतिरेकी संघटना दिशाभूल करीत आहेत. मात्र, आम्ही धार्मिक भावनांचा आदर करतो, त्यांचा सन्मान करतो.