शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
5
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
6
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
7
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
8
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
9
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
10
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
11
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
12
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
13
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
14
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
15
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
16
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
17
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
18
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
19
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
20
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

"सर्व प्रयत्न करूनही आमच्याकडून...", नेतन्याहू यांनी ४५ पॅलेस्टिनींच्या मृत्यूबाबत मान्य केली 'चूक'! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 11:57 AM

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही 'दुःखद चूक' मानली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून  इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धाला सर्वसामान्य नागरिकही बळी पडत आहेत. रविवारी दक्षिण गाझामधील राफाह शहरातील विस्थापित पॅलेस्टिनींच्या छावणीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात जवळपास ४५ लोक ठार झाले. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही 'दुःखद चूक' मानली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

हमाससोबत युद्ध लढणाऱ्या इस्रायलला आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. अमेरिकेसारख्या त्यांच्या काही निकटवर्तीय देशांनीही नागरिकांच्या मृत्यूबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. जगतील सर्वोच्च न्यायालयातही त्याविरोधात आवाज उठवला जात असताना, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करत असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. 

गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलला राफाहमधील हल्ले थांबवण्यास सांगितले. इस्रायली लष्कराने यापूर्वी सांगितले होते की, त्यांनी नागरिकांच्या मृत्यूची चौकशी सुरू केली आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रविवारी रात्रीचा हल्ला, जो युद्धातील सर्वात प्राणघातक हल्ल्यांपैकी एक असल्याचे दिसते. युद्धात मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनींची संख्या ३६,००० पेक्षा जास्त झाली आहे.

आमच्याकडून दुःखद चूक झाली - नेतान्याहू "निर्दोष नागरिकांना इजा होऊ नये यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न असूनही, काल रात्री आमच्याकडून एक दुःखद चूक झाली," असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सोमवारी इस्रायलच्या संसदेला संबोधित करताना सांगितले. ते म्हणाले, 'आम्ही घटनेचा तपास करत आहोत आणि हे आमचे धोरण असल्यामुळे निष्कर्ष काढू.'

४५ लोकांचा मृत्यूतेल अल-सुलतानच्या वायव्य भागात घटनास्थळी पोहोचलेले मोहम्मद अबुसा म्हणाले की, बचाव कर्मचाऱ्यांनी "खूप वाईट परिस्थितीत असलेल्या लोकांना बाहेर काढले." गाझा आरोग्य मंत्रालय आणि पॅलेस्टिनी रेड क्रिसेंट रेस्क्यू सर्व्हिसच्या मते, किमान ४५ लोक मारले गेले. मंत्रालयाने सांगितले की मृतांमध्ये किमान १२ महिला, आठ मुले आणि तीन प्रौढांचा समावेश आहे, तर इतर तीन मृतदेह गंभीरपणे जळाल्यामुळे ओळखू शकले नाहीत.

टॅग्स :Benjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायल