कोरोना महामारीपासून बचावासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अल्कोहोल बेस्ड हॅंड सॅनिटायजरने हात धुण्याचा सल्ला दिला आहे. याने कोरोना व्हायरस संक्रमणापासून बचावास मदत होते. त्यामुळे बाजारात अनेक सॅनिटायजर आले आहेत. अशात एका वैज्ञानिकेला कचऱ्यापासून सॅनिटायजर बनवण्यात यश मिळालंय. कचऱ्याचा वापर करून हॅंड सॅनिटायजर बनवण्याला पर्यावरण संरक्षणासाठी एक महत्वपूर्ण पाउल मानलं जात आहे.
अब्जो रूपये वाचणार
इस्त्राइलच्या तेलअवीव यूनिव्हर्सिटीच्या रिसर्च टीमने कोरोना महामारीसोबत लढाई जिंकण्यासाठी कमी खर्चात हॅंज सॅनिटायजर बनवण्याच्या उद्देशाने कचऱ्याचा वापर केला. कचऱ्यापासून आधी इथेनॉल तयार करण्यात आलं आणि त्यापासून हॅंड सॅनिटायजर तयार करण्यात यश मिळालं. यासाठी फार कमी खर्च आला असून याने देशाचे अब्जो रूपये वाचणार आहे.
द टाइम्स ऑफ इस्त्राइच्या रिपोर्टनुसार, प्राध्यापक हादास मामने आणि त्यांची टीम कचऱ्यापासून अल्कोहोल तयार करण्यात गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्नात होते. आता त्याचा रिझल्ट समोर आला आहे. कचऱ्यापासून तयार इथेनॉल आता हॅंड सॅनिटायजर म्हणून वापरलं जाईल. याने आता इस्त्राइलला दुसऱ्या देशातून हॅंड सॅनिटायजर आयात करण्याची गरज पडणार नाही.
कसा केला कचऱ्याचा वापर?
प्राध्यापिक हादास यांनी सांगितले की, त्या कचरा रिसायकल करून अल्कोहोल तयार करण्यावर गेल्या ५ वर्षापासून काम करत होत्या. त्यांनी इथेनॉल तयार करण्यासाठी फॅक्ट्रीमध्ये वापरलेले पेपरचे तुकडे, काही प्लास्टिकचे तुकडे आणि बेकार गवतसहीत इतर काही कचरा एकत्र केला. कचरा रिअॅक्टरमध्ये टाकल्यावर ओजोन गॅसचा हलका डोज वापरला. या मेथडसोबतच आणखी काही टेक्नीकचा वापर केल्यावर इथेनॉल तयार होण्यास मदत झाली.
प्राध्यापिका हादास म्हणाल्या की, या प्रक्रियेत फारच कमी पैसे खर्च झाले आणि कमी साधनांचा वापर करावा लागला. इथेनॉलपासून सॅनिटायजर तयार करण्यात आता काहीही अडचण नाही. त्या म्हणाल्या की, याआधीही भाज्यांपासून इथेनॉल तयार केलं जात होतं. आता कचऱ्यापासून हे तयार झाल्याने फारच मोठं यश मिळालंय. हे पर्यावरणासाठीही चांगलं आहे.
इस्त्राइलच्या या यशाचं कौतुक जगभरातून होत आहे. या शोधामुळे इस्त्राइलचा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्नही सुटला आहे. तसेच असेही मानले जात आहे की, इस्त्राइलला इथेनॉल आयात करण्यासाठी लागणारे अब्जो रूपयेही वाचणार आहेत.
बाबो! एका दिवसात मानवी मेंदूत येतात 'इतके' विचार, किती ते वाचून व्हाल अवाक्...