शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

इस्रायली गायिका लिओराला पुन्हा बॉलीवूडचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2017 3:54 PM

इस्रायली गायिका लिओरा यित्झॅक हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल भेटीत दोन्ही देशांची राष्ट्रगीते गाण्याची संधी मिळाली आहे.

ऑनलाइन लोकमत

लॉड (इस्रायल) दि.1- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इस्रायलमध्ये भारताचे राष्ट्रगीत जन गण मन आणि इस्रायलचे राष्ट्रगीत हकित्वा गाऊन केले जाणार आहे. इस्रायली गायिका लिओरा यित्झॅक हिला ही दोन्ही राष्ट्रगीते गाण्याची संधी मिळाली आहे. याबाबत बोलताना बॉलीवूडमध्ये गाण्याच्या आपल्या स्वप्नाला नव्याने संजीवनी मिळेल असे मत तिने व्यक्त केले आहे.
 
लिओराचे आई-वडिल मुंबईमधूनच इस्रायलला स्थलांतरित झाले होते. तिचा जन्म इस्रायलमध्येच झाला. बॉलीवूडमध्ये तिने सुरु केलेले करिअर सतत घराची तीव्र आठवण येऊ लागल्यामुळे सोडून दिले होते. आता पुन्हा ते सुरु होईल असे तिला वाटते. वयाच्या 15 व्या वर्षीच तिने शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी पुण्याच्या सूर संवर्धन संस्थेत प्रवेश घेतला. पद्मा तळवलकर आणि पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे तिने शिक्षण घेतले त्याचप्रमाणे 1991-98 या काळात तिने भजन आणि गझल गायनही शिकून घेतले. त्यानंतर तिला बॉलीवूडमध्ये संधी मिळाली. दिल का डॉक्टर या चित्रपटामध्ये तिने गाणे गायले. तिने कुमार सानू, उदित नारायण आणि सोनू निगम यांच्याबरोबरही गाणी गायली होती. बॉलीवूडमध्ये हा सगळा प्रवास सुरु असताना अचानक तिला कुटुंबाची प्रकर्षाने आठवण येऊ लागली.  सलग आठ वर्षे कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे होमसिक झालेल्या लिओराने गाण्याच्या काही ऑफर्स नाकारून इस्रायलला जाण्याचा निर्णय घेतला. "मी केवळ 23 वर्षांची होते, आठ वर्षे माझे आई-बाबा आणि भावंडांपासून दूर राहिल्यामुळे मी होमसिक झाले होते. मला भारत आवडतो पण तेव्हा कुटुंबापासून झालेली ताटातूट सहन होणारी नव्हती" अशा शब्दांमध्ये तिने आपल्या भावना माध्यमांसमोर मांडल्या.  माला माला या तिच्या गाण्यामुळे लिओरा इस्रायलमध्ये प्रसिद्ध झाली. तसेच तू ही मेरा प्यार पहला या हिंदी- हिब्रू गाण्यामुळे तिचे इस्रायलच्या प्रत्येक घरात स्थान मिळाले. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 2015 साली इस्रायलच्या दौऱ्यावर असताना इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी आयोजीत केलेल्या भोजनावेळेस गाण्याचीही तिला संधी मिळाली होती. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नेत्यानाहू यांनी आयोजीत केलेल्या भोजन समारंभाप्रसंगीही ती गाणार आहे.
 
पंतप्रधान भेटणार मोशेला
26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सुखरुप बचावलेला मुलगा मोशे यालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यामध्ये भेटणार आहेत. 2008 साली मुंबईतील खाबाद हाऊसवर झालेल्या हल्ल्यामध्ये मोशेचे आई-बाबा रिवका आणि गॅव्रिएल होल्टझबर्ग मारले गेले होते. मोशेची काळजी घेणारी दाई सॅंड्रा सॅम्युएल्स हिने त्याचे प्राण वाचवले होते. सॅंड्राच्या या धाडसी कृतीबद्द्ल इस्रायल सरकारने तिचा पुरस्कार देऊन सन्मानही केला होता.
 
 
आता मोशे त्याच्या आजी आजोबांबरोबर इस्रायलमध्ये राहतो. आता तो 11 वर्षांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोशेच्या भेटीला येणार असल्याचे कळताच त्याचे आजी-आजोबा आनंदून गेले आहेत. "ज्यावेळेस भारतीय राजदुतांनी पंतप्रधान मोदी आमच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले तेव्हा माझा माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. भारत आजही आमचे दुःख वाटून घेण्यास प्रयत्नशील असल्याचे पाहून आम्हाला फारच आनंद झाला" अशा शब्दांमध्ये मोशेचे आजोबा राबी शिमोन रोसेनबर्ग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.