इस्रायल संरक्षण दलाचे माजी प्रमुख आणि युद्ध मंत्रिमंडळाचे विद्यमान मंत्री गादी ईसेनकोट यांनी गाझा युद्धात आपल्या मुलानंतर आता आपला भाचा गमावला आहे. ईसेनकोट यांचा भाचा माओर मीर कोहेनचा गाझा पट्टीत हमासविरुद्ध लढताना मृत्यू झाला. मंत्र्यांचा मुलगा गॅल मीर ईसेनकोटचाही काही दिवसांपूर्वी गाझामधील युद्धादरम्यान मृत्यू झाला होता.
माओर मीर कोहेन हा गाझामध्ये तैनात होता. तो ईसेनकोटची सावत्र बहीण शेरोन ईसेनकोट आणि मायकल मिशेल कोहेन यांचा मुलगा होता. माओर आणि गॅलच्या पालकांनी त्यांचं नाव आजोबा मीर यांच्या नावावरून ठेवलं होतं. 7 डिसेंबर रोजी उत्तर गाझा पट्टीमध्ये झालेल्या लढाईत सार्जंट मेजर (रिझर्व्ह सर्व्हिसेस) गॅल मीर ईसेनकोटला आपला जीव गमवावा लागला. तो बटालियन 699 मध्ये रिझर्व्हिस्ट म्हणून कार्यरत होता.
जेव्हा ईसेनकोट यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाली, तेव्हा ते मंत्री बेनी गॅंट्झ यांच्यासमवेत एका दौऱ्यावर होते. गॅलवर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याला निरोप देण्यासाठी हजारो लोक जमले होते. आपल्या मुलाला निरोप देताना गादी ईसेनकोट म्हणाले, "माझ्या लहान मुला गॅलुश, तुझी आई आणि मी शेवटचा तुमचा सन्मान करण्यासाठी येथे आलो आहोत."
7 ऑक्टोबरच्या भयंकर दिवसाची आठवण करून, गादी ईसेनकोट यांनी द जेरुसलेम पोस्टला सांगितलं की त्याचा मुलगा गॅल युद्धासाठी तयार झाला होता. तो म्हणाला, 'हमासला संपवण्यासाठी त्याने गाझा युद्ध महत्त्वाचं मानलं आहे'. ईसेनकोट यांनी गॅलसाठी शपथ घेतली की त्याचं आणि इतर सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. इस्रायल एक मजबूत, प्रगतीशील आणि न्यायपूर्ण देश राहील, जसा तुम्हाला नेहमी हवा होता असंही म्हटलं आहे.