शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 7:28 AM

मध्यरात्री तब्बल तीन तास सुरू असलेल्या या हल्ल्यात इस्रायलच्या शंभरपेक्षाही जास्त फायटर जेट्सचा समावेश होता. इस्रायलने आपल्या या मोहिमेला ‘डेज ऑफ रिपेन्टन्स’ म्हणजेच ‘पश्चात्तापाचे दिवस’ असे नाव दिले होते.

इस्रायल आणि अरब देश यांच्यात गेल्या कित्येक वर्षांपासून विस्तव जात नाही. दोन्ही बाजू एकमेकांना पाण्यात पाहत असतात आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. अलीकडेच म्हणजे १ ऑक्टोबरला इराणनेइस्रायलवर २०० मिसाइल्सनी जोरदार हल्ला केला. अर्थात यातले अनेक मिसाइल्स आम्ही हवेतच नेस्तनाबूत केले असा दावा इस्रायलने केला असला, तरी या हल्ल्याचा लगेच बदलाही घेतला. शनिवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी इराणच्या वीस ठिकाणांवर त्यांनी अचानक हवाई हल्ला केला. मध्यरात्री तब्बल तीन तास सुरू असलेल्या या हल्ल्यात इस्रायलच्या शंभरपेक्षाही जास्त फायटर जेट्सचा समावेश होता. इस्रायलने आपल्या या मोहिमेला ‘डेज ऑफ रिपेन्टन्स’ म्हणजेच ‘पश्चात्तापाचे दिवस’ असे नाव दिले होते. अर्थातच आमच्यावर हल्ला केल्यामुळे इराणसाठी आता ‘पश्चात्तापाचे दिवस’ असतील असे इस्रायलला सुचवायचे आहे. 

या बदल्याच्या मोहिमेचे आणखी एक आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे या हल्ल्यासाठी इस्रायलने आपल्या महिला फायटर्सनाही या मिशनवर पाठवले होते. ‘आम्ही आमच्या महिला फायटर्सना कमी मानत नाही; पण तुमच्याशी लढण्यासाठी आमच्या महिलाही पुरेशा आहेत, हे दाखवण्याचा इस्रायलचा प्रयत्न होता. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) आपल्या या फायटर महिलांचे फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध करून इराणविरुद्धच्या या मोहिमेची जगाला माहिती दिली. त्यांनी जे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केले, त्यात इस्रायलच्या महिला फायटर्स ऑपरेशन फत्ते करण्यासाठी रवाना होताना दिसत आहेत. ‘टाइम्स ऑफ इस्रायल’च्या माहितीनुसार या मोहिमेत आयडीएफचे फायटर जेट्स आपल्या मूळ स्थानापासून तब्बल १६०० किलोमीटर इराणच्या अंतर्भागात गेले होते. इराणवरील या हल्ल्यासाठी त्यांनी एफ-१५ आणि एफ-१६ या आपल्या फायटर जेट्सना पूर्ण सूट दिली होती. इराणच्या अंतर्भागात कितीही घुसण्याची आणि काहीही करण्याची पूर्ण परवानगी त्यांना होती.

इस्रायलने इराणवर जे हल्ले केले त्यात प्रामुख्याने इराण ज्या ठिकाणी त्यांची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे बनवते, त्यांनाच निशाणा करण्यात आला होता. याच क्षेपणास्त्रांचा उपयोग इराणने एक ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात करण्यात आला होता. त्यात फारशी मनुष्यहानी झाली नसली तरी इस्रायलने त्याच वेळी या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असे जाहीर केले होते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी इराणवर हवाई हल्ले केले. १९८० च्या दशकात इराण-इराक युद्धानंतर पहिल्यांदाच कोणत्याही देशाने इराणवर अशा तऱ्हेचे हवाई हल्ले केले आहेत. इस्रायलच्या या हल्ल्यानंतर ‘आम्हाला पलटवार करण्याचा पूर्ण अधिकार आहे’ असे इराणने जाहीर केले असले तरी अमेरिकेने त्यांना आता यापुढे काहीही कारवाई न करण्याचा इशारा दिला आहेे. इराणने असे काही केले तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, अशी गर्भित धमकी त्यात लपलेली आहे. ‘दोघांकडून हल्ले झाले आहेत, फिट्टंफाट झाली आहे, आता कोणीही पुन्हा दुसऱ्या देशावर कारवाई करू नका’, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. त्याच वेळी या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही, आम्ही इस्रायलला कोणत्याही तऱ्हेने समर्थन दिलेले नाही, हेही यातून अमेरिकेने सूचित केले आहे. 

अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन  यांनी इराणला इशारा दिला आहे की, इस्रायलवर पलटवार करण्याची चूक इराणने आता चुकूनही करू नये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही इराण आणि इस्रायल यांना आपसांतील दुश्मनी संपवण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे इराणने दावा केला आहे की, इस्रायलने आमच्यावर जे हवाई हल्ले केले त्यात त्यांनी इराकच्या हवाई भूमीचा वापर केला, जी भूमी सध्या अमेरिकेच्या कंट्रोलमध्ये आहे. इराकने याबाबत चुप्पी साधली असली तरी अमेरिकेने स्पष्ट केले आहे की या हल्ल्यात आमचा कुठलाही संबंध नव्हता. आम्हाला फक्त या ऑपरेशनची कल्पना देण्यात आली होती. इराकचे एक नेता मुकतदा अल सदर यांनी मात्र या प्रकरणाची चौकशी चौकशी होऊन संबंधितांवर कारवाईदेखील झाली पाहिजे, असे म्हटले आहे. 

दर चार वर्षांनी एक युद्ध!गेल्या कित्येक वर्षांपासून मध्यपूर्व अशांत आहे आणि युद्धाच्या धगींनी तो धगधगतो आहे. गेल्या तीस वर्षांपासून येथे युद्धाचे वणवे सातत्याने पेटताहेत. साधारण दर चार वर्षांनी मध्यपूर्वेत एक तरी युद्ध होतेच, असा इतिहास आहे. १०४ वर्षांपूर्वी इंग्रजांनी अरब देशांचे विभाजन केले होते. हा इतिहासही आजच्या या अशांततेला कारणीभूत आहे. २६ ऑक्टोबरला इस्रायलने त्यांच्या महिला फायटर्ससह सैनिकांना अचानक आदेश दिले आणि मध्यरात्री दोन ते पहाटे पाच या काळात ही मोहीम फत्ते करण्यात आली.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणWorld Trendingजगातील घडामोडी