Israel Lebnon News : इस्रायल आणि लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इस्रायल सातत्याने लेबननॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले करत आहे. इस्रायली लष्कराच्या कारवाईत हिजबुल्लाचे अनेक कमांडरही मारले गेले आहेत. गेल्या शुक्रवारी इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये लपलेला हिजबुल्लाहचा कमांडर हसन नसरल्लाह ठार झाला होता. त्यानंतर आता आज(4 ऑक्टोबर) इस्रायलने संघटनेचा नवीन कमांडर हाशिम सफीद्दीन, यालाही ठार केले आहे.
इस्रायलचे हल्ले सुरुचमिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने बेरुतवर हवाई हल्ला करुन हाशिम हफीद्दीन याला ठार केले. सफीद्दीन बंकरमध्ये गुप्त बैठका घेत होता. यापूर्वी, 27 सप्टेंबर रोजी इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात हसन नसरल्लाह अशाचप्रकारे मारला गेला होता. सफीद्दीन आणि नसराल्लाह चुलत भाऊ होते. नसराल्लाहच्या मृत्यूनंतर सफीद्दीनला हिजबुल्लाचा प्रमुख करण्यात आले. मात्र याची घोषणा होण्यापूर्वीच इस्रायलने त्याला कंठस्नान घातले.
युद्ध आणखी तुव्र होणारइस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत हिजबुल्लाचे अनेक टॉप कमांडर मारले गेले आहेत. इस्त्रायलचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल हरजी हालेवी यांचे म्हणणे आहे की, हिजबुल्लाच्या एकाही कमांडरला आम्ही सोडणार नाही. आम्ही शोधून-शोधून त्यांना ठार करू. लेफ्टनंट जनरल हरजी हलेवी यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, इस्रायलची हिजबुल्लाविरुद्धची कारवाई आणखी तीव्र होणार आहे.
हिजबुल्लाह कमजोर झालीइस्रायल हिजबुल्लाहला दहशतवादी संघटना मानतो. गाझामध्ये हिजबुल्लाह हमासला पाठिंबा देत आहे. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धात हिजबुल्लाहचा हमासला पाठिंबा आहे. मात्र, लेबनॉनमधील सर्वात शक्तिशाली संघटना म्हणून पुढे आलेली हिजबुल्लाह आता कमकुवत होत चालली आहे. अलिकडच्या काही महिन्यांत, हिजबुल्लाहने त्यांचे अनेक कमांडर गमावले आहेत.
आतापर्यंत कोणाला मारले?
- हसन नसरल्लाह | हिज्बुल्लाह चीफ- हाशिम सफीद्दीन | हिज्बुल्लाह चीफ- इब्राहिम अकील | ऑपरेशन हेड- फौद शुक्र | टॉप कमांडर- अली कराकी | सदर्न फ्रंट कमांडर- विसम अल-तवील | रादवां फोर्स कमांडर- अबू हसन समीर | रादवां फोर्स ट्रेनिंग हेड- तालेब सामी अब्दुल्लाह | नासेर यूनिट कमांडर- मोहम्मद नासेर | अजीज यूनिट कमांडर
आता कोण जिवंत?इस्रायली लष्कराच्या माहितीनुसार, हिजबुल्लाहचा एकच कमांडर आता जिवंत आहे. अबू अली रिदा असे त्याचे नाव आहे. अबू अली रिदा हा हिजबुल्लाहच्या बद्र युनिटचा कमांडर असून, इस्रायल त्याचा शोध घेत आहे.