भारताचे अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटॅलाइट GSAT-N2 अवकाशात झेपावले आहे. ISRO अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे हे सॅटेलाईट (उपग्रहाच्या) उद्योगपती इलॉन मस्कच्या SpaceX यांच्या Falcon 9 रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कार्निव्हल येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. याचे कार्य सुरू झाल्यानंतर भारताची दळणवळण व्यवस्था अधिक बलशाली होईल, असे सांगितले जात आहे.
4700 किलोग्रॅम वजनाच्या GSAT-N2 अथवा GSAT 20 या सॅटेलाइटच्या सहाय्याने दुर्गम भागांतही इंटरनेटचीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. या सॅटेलाइटचे मिशन लाइफ 14 वर्षांचे आहे. यासंदर्भात ISRO चे प्रमुख एस सोमनाथ यांनी ही माहिती दिली. लॉन्चिंग दरम्यान ते म्हणाले, "GSAT 20 चे मिशन लाइफ 14 वर्षं एवढे आहे आणि जमिनीवरील पायाभूत सुविधा सॅटेलाइटच्या मदतीसाठी तयार आहे."
आता 3000 मीटर उंचीवर वापरता येईल इंटरनेट -अद्यापपर्यंत भारतात फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याची परवानगी नव्हती. मात्र, आता सरकारने नियम बदलले आहेत. आता विमान 3000 मीटर एवढ्या उंचीवर पोहोचल्यानंतर प्रवाशांना आपल्या मोबाईलवर इंटरनेट चालवता येईल. याच बरोबर, प्रवाशांना वाय-फायच्या माध्यमाने इंटरनेट सेवा वापरण्याची परवानगी तेव्हाच दिली जाईल, जेव्हा ज्या उंचीवर पोहोचल्यानंतरही विमानात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापराची परवानगी दिली जाते, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. का घेतली गेली SpaceX ची मदद?भारताचे स्वतःचे रॉकेट मार्क-3 हे केवळ 4,000 किलो वजनाचे सॅटेलाइट अथवा उपग्रह अवकाशात घेऊन जाऊ शकते. मात्र, GSAT-N2 चे वजन 4,700 किलो एवढे आहे, जे खूप अधिक आहे. चामुळे इस्रोने स्पेसएक्स या अमेरिकन कंपनीची मदत घेण्याचा निर्णय घेतला. SpaceX चे रॉकेट मोठे आणि शक्तिशाली आहेत. यामुळे ते GSAT-N2 अवकाशात पाठवू शकले. इस्रोसाठी दुसऱ्या कंपनीचे रॉकेट वापरण्याची ही पहिलीच वेळ असेल.