वॉशिंग्टन- पाकिस्तानला देण्यात येणा-या आर्थिक मदतीला अमेरिकेनं लगाम घातला आहे. पाकिस्तानकडून वारंवार दहशतवाद्यांना देण्यात येणा-या मदतीवरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. ते म्हणाले, 15 वर्षांत अमेरिकेनं पाकिस्तानला 33 बिलियन डॉलरची मदत केली आहे.परंतु पाकिस्ताननं या बदल्यात आम्हाला खोटी आश्वासनं आणि फसवणुकीशिवाय काहीही दिलेलं नाही. पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे. त्यांनी आमच्या नेत्यांना मूर्ख बनवलं आहे. मात्र यापुढे अमेरिका पाकिस्तानला आर्थिक मदत करणार नाही. अमेरिकेनं पाकिस्तानला 2002पासून आतापर्यंत जवळपास 33 अब्ज डॉलर एवढी आर्थिक मदत केली आहे. तर ऑगस्ट 2017मध्ये अमेरिकेनं पाकिस्तानला देण्यात येणा-या 255 मिलियन डॉलरच्या मदतीवरही टाच आणली होती.पाकिस्तान जोपर्यंत पूर्ण क्षमतेनं दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत पाकिस्तानला 25 कोटी 50 लाखांची मदत मिळणार नाही, असंही अमेरिकेनं ठणकावलं आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी कॅनेडियन दाम्पत्याच्या पाकिस्तानमधल्या तालिबान्यांनी केलेल्या अपहरणानंतर पाकिस्तान आणि अमेरिकेतले संबंध बिघडले आहेत.
पाकिस्तानला मदत करणं हा मूर्खपणा, अमेरिकेनं व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2018 6:57 PM