शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

इराणने ज्याला दिली इस्राइलच्या हेरगिरीची जबाबदारी तोच निघाला मोसादचा एजंट, माजी राष्ट्रपतींनी केला धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 7:29 PM

Isrial Iran News: इराणचे माजी राष्ट्रपती मोहम्मद अहमदीनिजाद यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. इराणने इस्राइलच्या हेरगिरीचा सामना करण्यासाठी तैनात केलेल्या एका सिक्रेट सर्व्हिस युनिटचा प्रमुख स्वत:च इस्राइलचा गुप्तहेर होता, असा दावा अहमदीनिजाद यांनी केला आहे.

इराणचे माजी राष्ट्रपती मोहम्मद अहमदीनिजाद यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. इराणने इस्राइलच्या हेरगिरीचा सामना करण्यासाठी तैनात केलेल्या एका सिक्रेट सर्व्हिस युनिटचा प्रमुख स्वत:च इस्राइलचा गुप्तहेर होता, असा दावा अहमदीनिजाद यांनी केला आहे. अहमदीनिजाद यांनी एका मुलाखतीमधून हा सनसनाटी दावा केला  आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अहमदीनिजाद यांनी सांगितले की,  इराणमध्ये इस्राइलच्या गोपनीय मोहीमांचा सामना करण्यासाठी उत्तरदायी असलेला इराणमधील सर्वात वरिष्ठ व्यक्ती ही स्वत:च मोसादची एजंट होती, हे २०२१ पर्यंत स्पष्ट झाले होते. इस्राइलने इराणमध्ये अनेक गुंतागुंतीच्या मोहिमा पूर्णत्वास नेल्या आहेत. त्यांना हवी ती माहिती ते सहजपणे मिळवू शकत होते, असा दावाही अहमदीनिजाद यांनी केला.  

अहमदीनिजाद पुढे म्हणाले की, इराणच्या गुप्तचर विभागामधील २० अतिरिक्त एजंट हे मोसादसाठी काम करत होते. त्यांच्याकडेच इस्राइलच्या हेरगिरीवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या कथित डबल एजंट्सनी इराणच्या अणुकार्यक्रमाची माहिती इस्राइलला पुरवली. तसेच इराणच्या अणुकार्यक्रमाच्या कागदपत्रांच्या झालेल्या चोरीसही हेच डबल एजंट जबाबदार होते. तसेच त्यांनी इराणच्या अनेक अणुशास्त्रज्ञांची हत्याही घडवून आणली होती, असा दावाही अहमदीनिजाद यांनी केला. दरम्यान, इराणच्या या माजी राष्ट्रपतींचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षInternationalआंतरराष्ट्रीय