ऑनलाइन लोकमत -
टोकियो, दि. १५ - जपानच्या आयलँड इजु ओशिमामध्ये असणा-या माउंट मिहारा येथे तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला परतीचं तिकीट काढणं सक्तीचं आहे. जर का तुम्ही वन-वे तिकीट काढलं तर ते बेकायदेशीर आहे. ऐकून आश्चर्य वाटत असेल पण हे खरं आहे. त्यामागचं कारणही तितकच भयानक आहे.
जगातील काही जागा सुसाईड पॉईंट म्हणून ओळखल्या जातात ज्यामध्ये माउंट मिहाराचादेखील समावेश आहे. माउंट मिहारा येथे ज्वालामुखी आहे. या ज्वालामुखीत उडी मारुन लोक आत्महत्या करतात, त्यामुळेच वन-वे तिकीट दिलं जात नाही. विश्वास बसणार नाही पण 1993 मध्ये 944 लोकांनी ज्वालामुखीत उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर माउंट मिहारामध्ये 350पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केली आहे. येथे फिरण्यासाठी येणारे अनेक लोक या धगधगत्या ज्वालामुखीमध्ये उडी मारुन आत्महत्या करतात. त्यामुळे याठिकाणी जाणा-या पर्यटकांना वन-वे तिकीट देण्यावर बंदी घालण्यात आली आहे.